Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र घोषणा प्रकाश आंबेडकरांची, समीकरणे बदलणार मविआची पण भाजपाच्या हाती हुकूमाचा पत्ता

घोषणा प्रकाश आंबेडकरांची, समीकरणे बदलणार मविआची पण भाजपाच्या हाती हुकूमाचा पत्ता

Subscribe

अकोला लोकसभा मतदारसंघामधून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश (बाळासाहेब) आंबेडकर यांनी निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता त्यांच्या या घोषणेमुळे आता महाविकास आघाडीमध्ये वाद होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

अकोला : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था नेमक्या कधी होणार याबाबत कोणतीही स्पष्टता मिळालेली नाही. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविण्यासाठी इच्छुक असलेले उमेदवार हे आता शांत झालेले पाहायला मिळत आहेत. परंतु राजकीय पक्षांकडून आता 2024 च्या लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू करण्यात आली आहे. अनेक नेत्यांनी लोकसभेच्या दृष्टीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकांकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. अकोला लोकसभा मतदारसंघामधून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश (बाळासाहेब) आंबेडकर यांनी निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता त्यांच्या या घोषणेमुळे आता महाविकास आघाडीमध्ये वाद होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. (Prakash Ambedkar Announcement of contest election from Akola Lok Sabha Constituency)

हेही वाचा – CM Eknath Shinde : राज्यातील मुख्यमंत्री पुन्हा बदलणार? एकनाथ शिंदेंनी दिले स्पष्टीकरण

- Advertisement -

अकोला लोकसभा मतदारसंघ हा सुरुवातीला काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. पण त्यानंतर या जागेवर वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसच्या मदतीने आपला उमेदवार निवडून आणला. त्यामुळे हा मतदारसंघ आता वंचितचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. परंतु या मतदारसंघात जर का वंचितला काँग्रेसची साथ मिळाली नसती तर ही जागा त्यांना मिळविता आली नसती. परंतु आता बाळासाहेबांनी केलेल्या घोषणेमुळे मविआची समीकरणे बदलणार असल्याचे सांगण्यात येत आहे. कारण बाळासाहेबांनी अकोला लोकसभेतून निवडणूक लढविण्याची घोषणा केलेली असली तरी ते नेमके कोणासोबत हातमिळवणी करणार हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही.

काही महिन्यांपूर्वी बाळासाहेबांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यामुळे शिवशक्ती आणि भीमशक्तीचा नारा देण्यात आला होता. ज्यानंतर बाळासाहेब हे देखील महाविकास आघाडीमध्ये सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत होते. पण राष्ट्रवादीसोबत पटत नसल्याने बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये पुन्हा कोणतीही चर्चा झालेली नाही. तर दुसरीकडे, बाळासाहेब आंबेडकर यांनी भारिपच्या माध्यमातून बहुजन व दलित समाजाला एकत्र आणून जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिकांमध्ये मोठे यश मिळविले आहे. कार्यकर्त्यांचा चांगला मोठा फौजफाटा त्यांच्यासोबत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू म्हणून दलित समाजातील मोठा वर्ग त्यांच्यासोबत आहे. तर काही मुस्लीम समाजाकडून त्यांना पाठिंबा देण्यात येत असल्याने अकोला लोकसभेतून ते निवडून येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

- Advertisement -

तर, या सर्वांमध्ये आता भाजप पक्षाकडून घेण्यात येणारा निर्णय हा महत्त्वाचा ठरणार आहे. कारण, मागील चार टर्म म्हणजेच 20 वर्षांपासून या मतदारसंघात भाजपचे संजय धोत्रे यांचा प्रभाव आहे. परंत सध्या प्रकृती अस्वस्थामुळे ते 2024मध्ये निवडणूक लढवणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे भाजपकडून नव्या चेहऱ्याची तयारी करण्यात येत आहे. त्यामुळे जर का एखादा प्रभावी उमेदवार भाजपकडून या जागेवर उभा करण्यात आला तर बाळासाहेब आंबेडकर यांच्यासमोरील आव्हान वाढू शकते.

- Advertisment -