घरताज्या घडामोडीआम्ही युतीसाठी ऑफर दिली होती पण.., प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

आम्ही युतीसाठी ऑफर दिली होती पण.., प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

Subscribe

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. विविध पक्षातील नेत्यांच्या गाठीभेटी सुरू आहेत. नुकतंच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे एकाच व्यासपीठावर दिसून आले होते. त्यानंतर त्यांनी आपल्या भाषणांमधून ऐकमेकांबाबत विधानं देखील केली होती. त्यामुळे राज्यात शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, युतीबाबत प्रकाश आंबेडकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

मुंबईत प्रकाश आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, आमची भूमिका स्पष्ट आहे. काँग्रेस-शिवसेना ठाकरे गटाला आम्ही युतीसाठी ऑफर दिली होती. परंतु अधिकृतरित्या दोन्ही पक्षांकडून आम्हाला अद्याप काहीही माहिती कळवण्यात आलेली नाही. ठाकरेंसोबत जो काही कार्यक्रम झाला तो अराजकीय होता, त्यामुळे आम्हाला सोबत घ्यायचंय की नाही, ते त्यांनी ठरवावं, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

- Advertisement -

महाविकास आघाडी काय करतेय हे कुणाला माहिती नाही. त्यांचे ठरत नाही तोवर नवीन समीकरण उभी राहतील असं वाटत नाही. परंतु काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून आम्हाला प्रस्ताव दिला तर आम्ही त्यांच्यासोबत जायला तयार आहोत, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

मुंबईतल्या शिवाजी मंदिर येथे ‘प्रबोधनकार डॉट कॉम’ या संकेतस्थळाचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे. पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकाच मंचावर आले होते. त्यावेळी एकाच मंचावर येण्यासाठी आम्हा दोघांनाही अडचण आली नाही आणि येणार पण नाही. प्रकाश आंबेडकर आणि मी अनेकदा भेटलो देखील आहोत. दोन्ही विचारांचे वारसे घेऊन पुढे जात आहोत, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. तर जे भांडण सुरू आहे ते लोकशाही विरुद्ध हुकूमशाही असं आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले होते. त्यामुळे आता लोकशाही वाचवण्यासाठी आणि टीकवण्यासाठी काँग्रेस-वंचित-शिवसेना ठाकरे गट एकत्र येणार का?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा : जे भांडण सुरू आहे ते लोकशाही विरुद्ध हुकूमशाही असं आहे – प्रकाश आंबेडकर


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -