घरताज्या घडामोडीPrakash Ambedkar : आम्ही एकनाथ शिंदेंसोबतही बसायला तयार, प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान

Prakash Ambedkar : आम्ही एकनाथ शिंदेंसोबतही बसायला तयार, प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान

Subscribe

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी भाजपसह छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर टीका करत आम्ही एकनाथ शिंदेंसोबत (cm eknath shinde) बसायला तयार आहोत, असं मोठं विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे लोकांची काम करण्यासाठी त्यांना भेटावं लागतं. त्याचा वेगळा अर्थ नको. भाजपासोबत आमचं कधीच जमणार नाही. पण आम्ही एकनाथ शिंदेंसोबत यांच्यासोबतही बसायला तयार आहोत, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

- Advertisement -

धार्मिक सभागृह करण्याचा प्रयत्न

न्यूट्रल सभागृहात धार्मिक सभागृह करण्याचा प्रयत्न या उद्घाटनाच्या कार्यक्रमात झाला. दक्षिण आणि उत्तरेतला वाद हा वैधिक धर्मातला जुना वाद आहे. हा वर्चस्वाचा वाद आहे. कुठेतही स्थिरता यायला पाहिजे होती. परंतु ती स्थिरता दिसत नाही. प्रयागराज, वाराणसी ही वैद्यीक पीठासनं अग्रस्थान मानलं जातं. भारताने देखील या अग्रस्थानाला मान्यता दिली आहे. परंतु तुम्ही त्यांना डावलून दक्षिणेतले असताना याला महत्त्व देताय. यामध्ये खऱ्या अर्थाने राजकारण आहे. मी काल पंडितांसोबत बसलो होतो. आव्हान स्वीकारणं ही त्यांची भावना आहे. तुम्ही सिम्बॉल जरी आणला असता आणि उत्तरेमधील पंडितांचं स्थान जरी ठेवलं असतं तरी काहीच फरक पडला नसता, असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी मोदींवर टीका केली.

भुजबळ यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीच्या कार्यक्रमात अहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाई फुले यांचे पुतळे महाराष्ट्र सदनातून हटवण्यात आले. यावर प्रतिक्रिया देताना आंबेडकर म्हणाले की, आंदोलक म्हणून माझं असं म्हणणं आहे की, छगन भुजबळ यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यायला पाहिजे. कारण ते ओबीसीचं एक प्रतिक म्हणून मानले जातात. स्वत;ला ते ओबीसीचे नेते म्हणून मानतात. तेव्हा हा ओबीसीचा अपमान आहे. अहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाई फुले यांचा ज्या सभागृहात अपमान होत असेल तर त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : Maharashtra Weather Update : पुढील २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता, ‘या’ जिल्ह्यांना इशारा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -