“झुकाने वाला चाहिये सरकार उसके सामने झुकती है…” प्रकाश आंबेडकरांचं मोदी-शहांना चॅलेंज

शिवसेनेसोबत युती केल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना चॅलेंज दिलंय.

Prakash-Ambedkar-On-Modi-Amit-Shah
"झुकानेवाला चाहिये, सरकार उसके सामने झुकती है... 2024 मध्ये यांना झुकावं लागेल, हेच आव्हान मी देतोय" असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांना चॅलेंज दिलंय.

Prakash Ambedkar On Modi and Shah : शिवसेनेसोबत युती केल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना चॅलेंज दिलंय. २०१४ च्या निवडणुकीत बिगर-भाजप सरकार सत्तेत आलं तर मोदी आणि शाह दोघांना जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही, असं विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलंय. तसंच “झुकानेवाला चाहिये, सरकार उसके सामने झुकती है… २०२४ मध्ये यांना झुकावं लागेल, हेच आव्हान मी देतोय,” असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शहांना चॅलेंज दिलंय.

शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची युतीनंतर पहिल्यांदाच वंचित अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची पुण्यात जाहीर सभा झाली. वंचित बहुजन आघाडी हवेली पश्चिम तालुका व खडकवासला विधानसभेच्या वतीने ही सभा आयोजित करण्यात आली होती. ते या सभेत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या सभेत बोलत असताना प्रकाश आंबेडकरांनी नरेंद्र मोदी आणि भाजपवर आक्रमक होते जोरदार टीका केली आहे.

चोराच्या मनात चांदणं असतं तसं मोदींच्या मनामध्ये भीती आहे

ते म्हणाले, “भाजप सरकार हे राजकारण्यांना ईडी, सीबीआय, आयबीचा धाक दाखवतात सत्ता काबीज करतात आणि सत्तेवर येऊन नरेंद्र मोदी हुकूमशाह असल्यासारखे वागतात. बीबीसीने तयार केलेल्या डॉक्युमेंट्रीवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. चोराच्या मनात चांदणं असतं तसं मोदींच्या मनामध्ये भीती आहे. माझं २००४ चं चारित्र्य पुन्हा लोकांसमोर येईल, म्हणून त्यांनी बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीवर बंदी आणली आहे. जे जे सत्य दाखवण्याचा प्रयत्न करतात त्यांना आत टाकण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केलाय.

मी मोदींना चार प्रश्न विचारतो आणि त्यांनी उत्तर द्यावे…- प्रकाश आंबेडकर

देशाचे विभाजन कॉर्पोरेटमध्ये केले जाईल. लोकांचा पैसा आता या भांडवलदारांकडे वळवला जातो. किती जणांना माहिती आहे की, भारताचे सोने गहाण ठेवले गेले. ३५,००० टन सोनं बँक ऑफ इंग्लंडमध्ये ठेवले होते. मी विचारले तेव्हा पुढे बघू, असे सांगितले गेले. नरेंद्र मोदी यांचा नवीन फंडा आहे की, देश चालवण्यासाठी जेवढा निधी पाहिजे तेवढा जमत नाही. मग कारखाने विकून देश चालवला जात आहे. मोदी यांना एका बाजूला बसवा आणि मी एका बाजूला बसतो आणि मी त्यांना चार प्रश्न विचारतो आणि त्यांनी उत्तर द्यावे. एकतर मोदी पाहिजेत किंवा मोहन भागवत पाहिजेत, बाकी कोणी नको… , असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

पाहा काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

सभेपूर्वी इतर पक्षातील व संघटनेचे शेकडो कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पक्ष प्रवेश केला. या सभेत अनिल अण्णा जाधव, अशोकभाऊ सोनोने, प्रा. अंजलीताई आंबेडकर, प्रा. किसन चव्हाण, अमित भुईगळ इत्यादी नेत्यांची भाषणे झाली. यावेळी सूत्रसंचालन अॅड. अरविंद तायडे यांनी तर आभार प्रदर्शन सुनील कांबळे यांनी केले.