Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी Koregaon Bhima : 'या' प्रकरणी साक्षीसाठी फडणवीसांनाही बोलवा, प्रकाश आंबेडकरांची मागणी

Koregaon Bhima : ‘या’ प्रकरणी साक्षीसाठी फडणवीसांनाही बोलवा, प्रकाश आंबेडकरांची मागणी

Subscribe

भीमा-कोरेगाव प्रकरणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साक्ष तपासण्याची परवानगी द्या, अशा प्रकारचं मागणी पत्र वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी भीमा-कोरेगाव चौकशी आयोगाला पाठवलं आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्य सचिव सुमित मलिक आणि माजी पोलीस अधीक्षक (पुणे) मो सुवेज हक यांना विटनेस बॉक्समध्ये बोलावून त्यांची साक्ष तपासण्याची मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी पत्रात काय म्हटलंय?

भीमा-कोरेगाव चौकशी प्रकरणी आयोगासमोर साक्ष नोंदविण्यासाठी आपण मला दिनांक 5 जून 2023 रोजी बोलाविले आहे. परंतु यादिवशी पूर्व नियोजित कार्यक्रमामुळे मी मुंबईत नसल्यामुळे हजर राहू शकत नाही. मी दिनांक 14 जून व 15 जून 2023 रोजी मुंबईत आहे. तारखांना साक्ष ठेवल्यास मी हजर राहू शकेन.

- Advertisement -

आपण याआधी देखील मला अनेक पत्र पाठवली आहेत. मी याआधी आपल्याकडे मागणी केली होती की, माझी साक्ष घेण्याआधी आपण मला महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्य सचिव सुमित मल्लिक, माजी पोलीस अधीक्षक सुवेज हक यांना विट्नेस बॉक्समध्ये बोलावून त्यांची साक्ष तपासायची आहे, त्याप्रमाणे व्यवस्था करण्यात यावी, अशी विनंती मी आपणास करीत आहे, असे पत्रात प्रकाश आंबेडकरांनी म्हटले आहे.

 ‘या’ आरोपावर फडणवीसांचं प्रत्युत्तर 

प्रकाश आंबेडकर यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांची साक्ष नोंदवण्याची मागणी करुन तत्कालीन सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. साक्ष तपासण्याच्या मागणीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भीमा-कोरेगाव प्रकरणात यापूर्वी अनेकांनी आरोप केले होते, आता सर्व आयोग ठरवेल. प्रकाश आंबेडकर हे राजकारणाची दिशा बदलण्यासाठी असे आरोप करत असतात, असं प्रत्युत्तर फडणवीस यांनी दिलंय.

- Advertisement -

कोरेगाव-भीमा येथे जानेवारी 2018 साली दंगल झाली आणि त्यानंतर याप्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या भीमा-कोरेगाव चौकशी आयोगासमोर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना साक्ष देण्यासाठी बोलावण्यात आलं होतं. आतापर्यंत शरद पवार, विश्वास नांगरे पाटील यांनी आपली साक्ष नोंदवली आहे.


हेही वाचा : Nanded : चव्हाणांच्या बालेकिल्ल्यात शाहांची तोफ धडाडणार, भाजपने आखली रणनिती


 

- Advertisment -