घरमहाराष्ट्रPrakash Ambedkar : मी मविआला त्यांच्या चार जागा परत करतो, प्रकाश आंबेडकर...

Prakash Ambedkar : मी मविआला त्यांच्या चार जागा परत करतो, प्रकाश आंबेडकर स्पष्टच म्हणाले…

Subscribe

मविआकडून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना दिलेला चार जागांचा प्रस्ताव अद्यापही कायम आहे. मात्र, या चार जागा मी मविआला परत करतो, असे प्रकाश आंबेडकर यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.

मुंबई : मविआ आणि वंचित बहुजन आघाडी यांचा एकत्रित येण्याबाबतचा संभ्रम अद्यापही कायम आहे. गेल्या दोन महिन्यांपासून मविआकडून वंचितला सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अद्यापही वंचितकडून त्याबाबतचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. उलट वंचितने तर शिवसेना ठाकरे गटासोबत असलेली युतीदेखील संपुष्टात आल्याची घोषणा केली आहे. पण मविआकडून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना दिलेला चार जागांचा प्रस्ताव अद्यापही कायम आहे. मात्र, या चार जागा मी मविआला परत करतो, असे प्रकाश आंबेडकर यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. (Prakash Ambedkar explained his position regarding proposal of seats given Mahavikas Aghadi)

हेही वाचा… Prakash Ambedkar : अखेर ठरले, प्रकाश आंबेडकर अकोल्यातून उमेदवारी अर्ज भरणार 

- Advertisement -

आज मुंबईत प्रसार माध्यमांसमोर प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मी मविआला त्यांच्या चार जागा परत करत आहे. ते चार जागा बोलतात. पण बैठकीत अकोला आणि उर्वरित दोन जागा त्यांच्याकडून ऑफर करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे त्यांनी याबाबत खोटे बोलू नये. मविआचा 15 जागांचा तिढा अजून संपत नाहीय, तर मी कुठे जागा मागणार? ज्या उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असते त्यांना आपला अर्ज भरण्यासाठी वेळ लागतो. ज्याचा गुन्हेगारी रेकॉर्ड नाही तो दोन तासांतच उमेदवारी अर्ज भरतो. आम्ही आमच्या उमेदवारांचे रेकॉर्ड तपासलेले आहेत. त्यामुळे आमच्या उमेदवारांचे अर्ज दोन तासांत भरता यावा, याची आम्ही काळजी घेतलेली आहे, असे प्रकाश आंबेडकर यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

तर, भाजपाकडून इतर पक्षांना कमजोर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. इतर पक्षांना कमजोर केल्यावरच आम्हाला विजयी होता येईल, असे भाजपला वाटत आहे, असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला. त्यांनी महाविकास आघाडीच्या जागावाटपावरही भाष्य केले. मविआत 15 जागांचा तिढा संपलेला नाही. ते एकत्र लढणार आहेत की स्वतंत्रपणे लढणार आहेत, हे अजूनही ठरलेले नाही. काँग्रेस आणि शिवसेना गोंधळ घालत आहेत. तशा प्रकारचा गोंधळ आम्ही अद्याप घातलेला नाही. आम्ही पहिल्यापासून सांगत आहोत की तुमच्यातील 15 जागांचा वाद मिटवा. मात्र आम्हीच त्यांना साथ देत नाहीत, असे चित्र निर्माण केले जात आहे. आमच्यातील 15 जागांचा वाद मिटलेला आहे, असे प्रकाश आंबेडकर यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -