घरमहाराष्ट्रसक्रिय राजकारणात या, आम्हीही तुमच्यासोबत येऊ; प्रकाश आंबेडकरांची संभाजीराजेंना साद

सक्रिय राजकारणात या, आम्हीही तुमच्यासोबत येऊ; प्रकाश आंबेडकरांची संभाजीराजेंना साद

Subscribe

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर खासदार संभाजीराजे यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घएतली. या भेटीनंतर चर्चांणा उधाण आलं होतं. अशातच आता प्रकाश आंबेडकर यांनी संभाजीराजे यांना सक्रिय राजकारणात यांवं अशी साद प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. आरक्षण समर्थकांना सोबत घेऊन या, आम्हीही तुमच्यासोबत येऊ, असं मोठं विधान आंबेडकर यांनी केलं.

प्रकाश आंबेडकर यांनी एका वृत्त वाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी संभाजीराजे यांना सक्रिय राजकारणात या असं निमंत्रण दिलं. “मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी संभाजीराजे यांनी सक्रिय राजकारणात यावं. त्याशिवाय हा मुद्दा निकाली निघणार नाही. सत्तेत आल्याशिवाय आरक्षणाचा प्रश्न निकाली निघणं शक्य नाही. आरक्षणाच्या भूमिकेला पाठिंबा देणाऱ्यांना सोबत घ्यावं. आम्हीही तुमच्यासोबत येऊ,” असं आंबेडकर म्हणाले.

- Advertisement -

वंचितला सोबत घेणं दिल्लीतील नेत्यांना मान्य आहे का?

दरम्यान, महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी वंचित सोबत आघाडी करणार असल्याचं म्हटलं. यासाठी वंचित सोबत चर्चा करणार असल्याचं म्हटलं आहे. यावर प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली. नाना पटोले वंचितला सोबत घेण्याबद्दल बोलत आहेत. पण हे त्यांच्या दिल्लीतील नेत्यांना मान्य आहे का? त्यांनी ५०० कोटींचा आरोप लोकसभेत केला, आता ५०० कोटींमधील १०० कोटी आधी आम्हाला द्यावे. आम्हाला तेवढेच पुरेसे आहेत, असं सांगतानाच आम्हाला महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांचा अनुभव चांगला नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे आंबेडकरांच्या मनात नक्की चाललंय काय याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -