घरताज्या घडामोडीमुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी प्रकाश आंबेडकर थेट मंत्रालयात दाखल, नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?

मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी प्रकाश आंबेडकर थेट मंत्रालयात दाखल, नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?

Subscribe

महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. राज्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची चर्चा सुरू असतानाच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी प्रकाश आंबेडकर थेट मंत्रालयात दाखल झाले आहेत. परंतु या दोघांमध्ये नेमकी कोणत्या मुद्दयांवर चर्चा झाली, याची माहिती अद्यापही समोर आलेली नाहीये. मात्र, त्यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

प्रकाश आंबेडकर यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रालयात बैठक सुरु आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याबाबत ही महत्वपूर्ण बैठक असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या बैठकीकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.

- Advertisement -

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर काही दिवसांपूर्वी एकाच मंचावर आले होते. त्यानंतर ग्रॅन्ड हयात हॉटेलमध्ये सुद्धा त्यांनी उद्धव ठाकरेंची भेटी घेतली होती. यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल दीड तास बैठक झाली. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा एक भाग होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

ग्रॅन्ड हयातमध्ये बैठक होण्यापूर्वी ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई आणि वंचित शिष्टमंडळाची दोन वेळा बैठक झाली होती. या बैठकीनंतर ठाकरे आणि आंबेडकरांमध्ये बैठक झाली. या बैठकीत निवडणुकीत युती आणि जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याच्या चर्चा होत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : जलयुक्तशिवार अभियान २.० होणार सुरु ; राज्यमंत्रिमंडळ बैठकीत 16 महत्त्वाचे


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -