घरमहाराष्ट्रमुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकर म्हणतात युतीचा चेंडू...

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकर म्हणतात युतीचा चेंडू…

Subscribe

Prakash Ambedkar | वंचित बहुजन आघाडी नेहमीच काँग्रेससोबत भांडत राहिली आहे. काँग्रेसने आजपर्यंत चेपलं तरी भाजपासोबत गेलो नाही. काँग्रेसच्या विरोधकांसोबत राजकीय समझोता केला नाही. प्रत्येक पक्षाची भूमिका स्पष्ट असते. त्यामुळे कधीही भाजपासोबत जाण्याचा विचार नाही, असं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं.

मुंबई – शिवसेनेला आम्ही याआधीही युतीचा प्रस्ताव दिला होता. भाजपासोबत ते युतीत होते तेव्हा आम्ही त्यांना भाजपाची साथ सोडायला सांगितली होती. मात्र, त्यांनी साथ सोडली नाही. त्यामुळे युतीचा चेंडू आता उद्धव ठाकरेंच्या कोर्टात आहे, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज बोलून दाखवली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आज प्रकाश आंबेडकर यांनी बैठक घेतली. शिवसेनेसोबत युतीसाठी तयार असलेल्या प्रकाश आंबेडकरांनी अचानक एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले होते. मात्र, या बैठकीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आणि इन्स्टिट्युटबाबत चर्चा झाली असल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

वंचित बहुजन आघाडी नेहमीच काँग्रेससोबत भांडत राहिली आहे. काँग्रेसने आजपर्यंत चेपलं तरी भाजपासोबत गेलो नाही. काँग्रेसच्या विरोधकांसोबत राजकीय समझोता केला नाही. प्रत्येक पक्षाची भूमिका स्पष्ट असते. त्यामुळे कधीही भाजपासोबत जाण्याचा विचार नाही, असंही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं. तसंच, युतीचा चेंडू आता उद्धव ठाकरेंच्या कोर्टात आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी युतीचा हात पुढे केल्यास भविष्यात वंबिआ आणि शिवसेनेची युती होऊ शकते, असे संकेत मिळत आहेत.

- Advertisement -

दरम्यान, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रकाश आंबेडकर यांची भेट झाली. या भेटीत राजकीय चर्चा झाली नसल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांसमोर स्पष्ट केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या इन्स्टिट्युटसाठी इंदू मिलची जागा देण्यात आली होती. मात्र, काँग्रेसच्या काळात इन्स्टिट्युट उभी राहू शकली नाही. त्यांनी पुतळा बांधायचा निर्णय घेतला होता. आता शिंदे सरकारने इन्स्टिट्युट आणि पुतळा दोन्ही बांधायचं ठरवलं आहे. यासंदर्भातच आजच्या बैठकीत चर्चा झाली असल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली. तसंच, गझियाबादमध्ये डॉ.बाबासाहेबांचा पुतळा बनवायला दिला आहे. तो पुतळा पाहण्यासाठी १५ तारखेला एक समिती जाणार आहे. संभाव्य वाद टाळण्याकरता ही समिती नेमण्यात आली असून यामध्ये कुटुंबाच्या वतीने आनंद आंबेडकर जाणार आहेत, असंही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -