मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी तामिळनाडूतील मंत्री आणि मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माबद्दल केलेल्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. या प्रकरणी भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपकडून उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर टीका होती आहे. देशभरात उदयनिधी स्टॅलिन यांच्या वक्तव्याच्या विरोधात तीव्र पडसाद पडत आहेत.
महाराष्ट्रात राज्याचे कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांना महाराष्ट्रात प्रवेश बंदी घालवी, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे ट्वीट करत केली आहे. प्रकाश आंबेडकर उदयनिधी स्टॅटिनलच्या समर्थनार्थ फेसबुकवर पोस्ट शेअर केली आहे. यात प्रकाश आंबेडकर म्हणाले, “सनातन धर्म = छुआछूत”, असे म्हटले. यात प्रकाश आंबेडकरांना नाव न घेता सनातन शब्दावरून सुरू असलेल्या वादात त्यांनी उडी घेतली आहे.
सनातन धर्म = छुआछूत pic.twitter.com/6zcYZqtNQD
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) September 4, 2023
काय आहे संपूर्ण प्रकरण
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचा मुलगा आणि राज्य सरकारमधील मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी शनिवारी राजधानी चेन्नईमध्ये एका सभेला संबोधित केले. यामध्ये त्यांनी सनातन धर्माबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. उदयनिधी यांनी सनातन धर्माची तुलना डेंग्यू आणि मलेरिया, कोरोना सारख्या आजारांसोबत केली. ते म्हणाले, ‘मच्छर, डेंग्यू, कोरोना हे असे रोग आहेत, ज्यांचा आम्ही फक्त विरोध करु शकत नाही. तर यांचे समूळ उच्चाटन करावे लागते. सनातन धर्म देखील असाच आहे. सनातनचा फक्त विरोध करुन चालणार नाही, तर त्याला मुळातून संपवावे लागणार आहे.’
या लोकांना सनातन हिंदु धर्म कधीच समजू शकला नाही आणि भविष्यातही समजू शकणार नाही!
कारण, सनातन संस्कृती ही कोणत्याही प्रकारे प्रभावी औषधासारखी आहे, जी राष्ट्र विरोधी विचारधारेला भारतात वाढू देत नाही!
तामिळनाडूचे मुख्यमंत्री @mkstalin यांचा मुलगा @Udhaystalin याने सनातन धर्म… https://t.co/K4UszbdNGL— Mangal Prabhat Lodha (@MPLodha) September 4, 2023
मंगल प्रभात लोढा काय म्हणाले
कॅबिनेट मंत्री लोढा यांनी ट्विट करत आपलं मत व्यक्त करताना म्हटलं आहे की “या लोकांना सनातन हिंदु धर्म कधीच समजू शकला नाही आणि भविष्यातही समजू शकणार नाही! कारण, सनातन संस्कृती ही कोणत्याही प्रकारे प्रभावी औषधासारखी आहे, जी राष्ट्र विरोधी विचारधारेला भारतात वाढू देत नाही! तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांचा मुलगा उदयनिधी स्टॅलिन याने सनातन धर्म संपवण्याचे बोलून कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेचा अपमान केला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना मी विनंती करतो की, उदयनिधी स्टॅलिन, जोवर त्याचे विधान मागे घेत नाही, तोपर्यंत त्याला महाराष्ट्रात येण्यापासून बंदी घालावी! अशा लोकांना महाराष्ट्रात येऊ देऊन, आम्ही इथले वातावरण बिघडू देणार नाही!”