घरताज्या घडामोडीराज्यसभेच्या निवडणुकीत आपल्याला ऐकण्यात नसेल इतकी किंमत असेल, प्रकाश आंबेडकरांचा इशारा

राज्यसभेच्या निवडणुकीत आपल्याला ऐकण्यात नसेल इतकी किंमत असेल, प्रकाश आंबेडकरांचा इशारा

Subscribe

राष्ट्रवादीच्या पश्चिम महाराष्ट्राच्या गडाला भगदाड पाडण्याचा भाजपचा डाव आहे. यामुळे ही निवडणूक थेट शिवसेनेविरुद्ध असली तरी ती प्रत्यक्षात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरुद्ध भाजप अशीच असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी भाजप आणि शिवसेनेकडून उमेदवार देण्यात आला आहे. राज्यात राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक (Rajya Sabha elections) होत आहे. पंरतु या जागांसाठी ७ उमेदवार रिंगणात आहेत. यामुळे निवडणूक चांगलीच चुरशीची होणार आहे. परंतु यामध्ये घोडेबाजार होणार असून ऐकण्यात नसेल एवढी किंमत असेल अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. तसेच यामध्ये शिवसेना भाजपमध्ये नाही तर भाजप -राष्ट्रवादीमध्ये लढत होत असल्याचे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी सांगितले.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राज्यसभेच्या निवडणुकीसंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये निवडणूक होणार असल्याचे ते म्हणाले. खरी निवडणूक तर शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांमध्ये होणार आहे. परंतु ही राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेची झाली आहे. कोल्हापूरमध्ये भाजपकडून तिसरा उमेदवार सहाव्या जागेसाठी देण्यात आला आहे. धनंजय महाडिक यांना संधी देण्यात आली आहे. महाडिक हे राष्ट्रवादीकडूनसुद्धा खासदार राहिले आहेत. दरम्यान ते आता भाजपमधून निवडणूक लढवत आहेत. कोल्हापूरमधील राष्ट्रवादीला हटवण्यासाठी हा भाजपचा डाव ठरू शकतो असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

- Advertisement -

राष्ट्रवादीला शिवसेनेचा उमेदवार निवडून आणावा लागेल

दरम्यान प्रकाश आंबेडकर म्हणाले की, भाजपकडून धनंजय महाडिक यांना उमदेवारी देण्यात आली आहे. तसेच शिवसेनेकडून कोल्हापूर जिल्हा प्रमुख संजय पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या उमेदवारीमुळे भाजप-शिवसेना अशी निवडणूक होणार आहे. परंतु ही लढत अशी असली तरी राष्ट्रवादीविरुद्ध भाजप असा संघर्ष असेल. कोल्हापूरमध्ये आपली ताकद कायम ठेवायची असेल तर राष्ट्रवादीला शिवसेनेचा उमेदवार निवडून आणावा लागेल. भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक यांना साखर कारखानदारी आणि सहकाराचा चांगला अभ्यास आहे. राष्ट्रवादीच्या पश्चिम महाराष्ट्राच्या गडाला भगदाड पाडण्याचा भाजपचा डाव आहे. यामुळे ही निवडणूक थेट शिवसेनेविरुद्ध असली तरी ती प्रत्यक्षात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरुद्ध भाजप अशीच असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

भाजपला राष्ट्रवादीस अव्हान देणं सोपं होईल

राष्ट्रवादी काँग्रेसला जर पश्चिम महाराष्ट्राचा गड राखायचा असेल तर त्यांना शिवसेनेचा उमेदवार निवडून आणावा लागेल. जर भाजपचा उमेदवार निवडून आला तर राष्ट्रवादीच्या गडाला भगदाड पडेल. तसेच भाजपला राष्ट्रवादीस आव्हान देणं सोप होईल. याचा आणखी एक प्रकारे फटका बसू शकतो तो म्हणजे केंद्राकडे इथेनॉलचं लायसन्स आहे. यामुळे साखर कारखानदारांना लालूच दाखवून भाजप आपल्याकडे वळवून घेईल आणि राष्ट्रवादीला फटका बसेल. यासाठी राष्ट्रवादीसमोर मोठं आव्हान उभं असल्याची प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : राज्यसभेच्या निवडणुकीची चुरस वाढली, काँग्रेस, भाजप आणि सेनेच्या बैठकांवर बैठका, काय होणार?

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -