कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी मतदारसंघातील माजी आमदार प्रकाश आवाडे जुव्या वसुलीसाठी आक्रमक झाल्याचे पाहायाला मिळत आहेत. अभिषेक मिल्स नावाच्या कंपनीत प्रकाश आवाडे यांनी भागिदारी करत गुंतवणूक केली होती. मात्र, ज्या प्रकल्पासाठी गुंतवणूक केली तो, प्रकल्पच उभा राहिला नाही. त्यामुळे आक्रमक झालेल्या प्रकाश आवाडे यांनी थेट कंपनीचे टाळं तोडत वसूलासाठी आत प्रवेश केला. प्रकाश आवाडे यांनी अभिषेक मिल्स कंपनीचा तोडलेल्या टाळ्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (prakash awade broke the lock of abhishek mills)
नेमकं प्रकरण काय?
कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी मतदारसंघातील माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी हुपरी रोडवरील अभिषेक मिल्समध्ये एका प्रकल्पासाठी गुंतवणूक केली होती. मात्र, न्यायालयीन प्रक्रिया आणि कोरोना आल्यामुळे प्रकल्प उभा राहू शकलेला नाही. त्यामुळे केलेली गुंतवणूक परत व्याजासह मिळावी या मागणीसाठी माजी आमदार प्रकाश आवाडे आक्रमक झाले. मागील दोन-तीन महिन्यांपासून प्रयत्न करूनही पैसे परत न आल्याने आवाडे यांनी आक्रमक होत अभिषेक मिल्समध्ये कुलूप तोडलं आणि वसूलीसाठी आत शिरले.
दरम्यान, ज्यावेळी प्रकाश आवाडे अभिषेक मिल्सच्या गेटवर दाखल झाले तेव्हा त्यांना आतून गेटला कुलूप लावल्याचं समजलं. त्यावेळी आवाडे यांच्या सहकाऱ्यांकडून उपस्थित कर्मचाऱ्यांना गेट उघडण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र, कर्मचाऱ्यांनी सांगितले की आम्हीच गेटच्या बाहेर आहोत, गेटचं कुलूप आतून लावण्यात आलं आहे. आम्ही कामगार आहे, आम्ही काही करु शकत नाही, त्यामुळे आत आवलेल कुलूप उघडू शकत नाही असे सांगितले.
त्यावेळी कोणत्याही परिस्थितीत वसूल करायची या हेतूने गेलेल्या प्रकाश आवाडे यांनी प्रवेशद्वाराचे गेटला असणारे कुलूप तोडले आणि आत प्रवेश केला.
हेही वाचा – Mohite Patil : रणजितसिंह मोहिते-पाटलांच्या अडचणीत वाढ, भाजप मोठी ‘अॅक्शन’ घेण्याच्या तयारीत