घरमहाराष्ट्रमहाजनांना पक्षवाढीसाठी पहाटे 4 पर्यंत जागावे लागत नव्हते; पूनम महाजनांचा टोला

महाजनांना पक्षवाढीसाठी पहाटे 4 पर्यंत जागावे लागत नव्हते; पूनम महाजनांचा टोला

Subscribe

राज्यातील ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन रात्री 10 – 10.30 झापायचे तरीही त्यांनी पक्ष वाढविला. त्यासाठी त्यांना मध्यरात्री 2 ते 4 वाजेपर्यंत बैठका घेण्याची गरज नव्हती, असा टोला खासदार पुनम महाजन यांनी भाजप नेत्यांना लगावला आहे. पुनम महाजनांनच्या वक्तव्याची आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहे. पुनम महाजन यांच्या टीकेचा रोख नेमका कोणाकडे होता यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहेत.

प्रमोद महाजन यांच्या 73 व्या जन्मदिनानिमित्त रविवारी ज्येष्ठ गायक श्रीधर फडके यांच्या गीतरामायण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुनम महाजन यांनी प्रमोद महाजनांच्या आठवणींना उजाळा देत अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी पुनम महाजन यांनी स्वत:च्या पक्षातील नेत्यांनाच लगावलेले टोले सर्वाधिक चर्चेचा विषय ठरत आहेत.

- Advertisement -

प्रमोद महाजन हे कधी कोणाचे साहेब नव्हते, प्रमोदजी होते, ते असामान्य व्यक्तिमक्त होते. केवळ रालोआतील नाही तर मुलायमसिंह यादव, शरद पवार, ममता बॅनर्जी यांच्यासह देशातील अनेक पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी प्रमोद महाजन यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. असं पुनम महाजन म्हणाल्या.

यावेळी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीविषयी पुनम महाजन आपली नाराजी व्यक्त केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या म्हाळगी प्रबोधिनीचे अध्यक्ष आहेत. रामभाऊ म्हाळगी संस्थेला गेल्या आठवड्यात 40 वर्षे पूर्ण झाली. प्रमोद महाजन यांनी केशवसृष्टी येथे जागा घेऊन आणि विचाराधिष्ठित स्वरूप देऊन ही संस्था नावारूपाला आणली. या संस्थेत प्रमोद महाजन यांचे छोटे फोटो आहे. मात्र, 40 वर्षांच्या वाटचालीनिमित्ताने प्रमोद महाजन यांच्या योगदानाबद्दल संस्थेने किमान सोशल मीडियावर एखादा मेसेज जरी प्रसारित केला असता, तर मला मुलगी म्हणून बरे वाटले असते, अशी खोचक टोलाही पुनम महाजन यांनी लगावला. त्यामुळे पुनम महाजन यांच्या टीकेचा रोख नेमका कोणाच्या दिशेने होता याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगतेय.

- Advertisement -

उद्धव ठाकरेंना सुनावले खडेबोल

भाजप – शिवसेना युती बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांच्यामुळे होती. दोघांनी विचार केला व दोन्ही पक्षांनी पुढे वाटचाल केली. त्यामुळे शिवसेना 25 वर्षे युतीत सडली, या उद्धव ठाकरे यांच्या विधानामुळे मला वाईट वाटले. त्यांनी युती केली नव्हती. हा त्यांच्या व माझ्या वडिलांचा आणि त्यापेक्षा उत्तुंग नेत्यांचा अपमान आहे. असे वक्तव्य करण्याची उद्धव ठाकरे व माझीही लायकी नाही, अशा शब्दात पुनम महाजन यांनी उद्धव ठाकरेंना खडेबोल सुनावले आहेत.

प्रमोद महाजन जेव्हा अंतिम घटका मोजत होते, तेव्हा बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात भेटायला आले होते. ‘ प्रमोद तू उठ, तुझी गरज आहे, ‘ असे ते वडीलकीच्या नात्याने म्हणाले होते. ते युतीसाठी होते की वैयक्तिक संबंधांसाठी होते, असा सवालही पुनम महाजन यांनी उपस्थित केला.


पंढरपूरच्या विठुरायाला सोन्याचा साज; भक्तांकडून 19 तोळे चंदनहार अर्पण


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -