घरठाणेपाण्यासाठी आईची फरपट पाहून १४ वर्षांच्या मुलाने केलं असं काम, तुम्ही म्हणाल...

पाण्यासाठी आईची फरपट पाहून १४ वर्षांच्या मुलाने केलं असं काम, तुम्ही म्हणाल व्वा!

Subscribe

आईची पाण्यासाठीची फरफट मुलाला न पावल्यामुळे त्यांनी घरासमोर खड्डा खोदून विहीर तयार केली. आईसाठी मुलाचे प्रेम पाहून सर्वजण अवाक झाले आहे.

मुंबई | महाराष्ट्रातील काही पाड्यात आजही पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागते. पालघरमध्ये एका १४ वर्षीय मुलाने आईला अर्धा किलोमीटर पाण्यासाठी जावे लागते. आईची पाण्यासाठीची फरफट मुलाला न पावल्यामुळे त्यांनी घरासमोर खड्डा खोदून विहीर (Well) तयार केली. आईसाठी मुलाचे प्रेम पाहून सर्वजण अवाक झाले आहे. पालघरच्या (Palghar) प्रणवची विहीर तयार करण्याची गोष्ट पंचक्रोशीतील पसरली. यानंतर प्रणवचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

प्रणव रमेश सालकर (Pranav Ramesh Salkar) असे या १४ वर्षीय मुलाचे नाव आहे. प्रणव सालकर हा पालघर तालुक्यातील केळवे गावातील धावांगे पाडामध्ये राहतो. धावांगे पाडा हा ६०० ते ७०० लोकवस्तीचा आहे. प्रणवची आई दर्शना आणि त्याचे वडील रमेश हे बागायती शेतीवर शेतमजूर म्हणून काम करतात. आई मजुरी करून थकून घरी आल्यानंतर पाण्यासाठी अर्धा किलोमीटर लांब जावे लागत असे. प्रणवने आईला होणारा हा त्रास पाहून घरासमोर विहीर खोदण्याचा निर्णय घेतला. प्रणवने सलग चार दिवसांपासून थोडाथोडा खड्डा खोदला. यानंतर प्रणवला १२-१५ फूल खोल खड्डानंतर गोड पाणी लागले.

- Advertisement -

या खोल खड्ड्यातून माती बाहेर काढण्यासाठी प्रणवने शिडी तयार केली. या शिडीच्या मदतीने प्रणवने माती खणून वर आणून टाकत होता. विहीरीसाठी खड्डा खोदताना प्रणवला दगडही लागली. त्यावेळी प्रणवने त्यांच्या वडिलांच्या मदतीने दगडीही फोडली. यानंतर प्रणव खड्डा खोदता असताना त्याला अखेर पाणी लागल्यानंतर प्रणवचा आनंद गगनात मावेनासा झाला.

प्रणवच्या केळवे गावात महाराष्ट्र ग्रामीण पाणी पुरवाठा योजनेंतर्गत पाणी पुरवणारे नळ आहेत. परंतु, या नळाला आठवड्यातील रविवार, मंगळवार आणि गुरुवार या तीन दिवस पाणी येते. पालघर तालुक्यातील केळवे गाव येथे खाजण जमिनीचा भाग असल्याने येथील विहीर आणि बोरिंगला खारट पाणी येते. यामुळेच धावांगे पाड्यातील लोकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते.

- Advertisement -

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -