घरमहाराष्ट्रShinde VS Satpute : पुलवामा हल्ल्यावरून प्रणिती शिंदेंचा भाजपावर आरोप; राम सातपुतेंचे...

Shinde VS Satpute : पुलवामा हल्ल्यावरून प्रणिती शिंदेंचा भाजपावर आरोप; राम सातपुतेंचे जोरदार प्रत्युत्तर

Subscribe

सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रचाराला सुरुवात झाली असून काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे आणि भाजपाचे उमेदवार राम सातपुते हे एकमेकांवर आरोपज-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. प्रणिती शिंदे यांनी भाजपावर निशाणा साधताना म्हटले होते की, जेव्हा भाजपकडे काही मुद्दे नसतात, तेव्हा ते काहीतरी घडवतात. मागील निवडणुकीवेळी पुलवामा घडवले, असा आरोप प्रणिती शिंदे यांनी केला. त्यांच्या या आरोपाला प्रत्युत्तर देताना राम सातपुते यांनी म्हटले की, प्रणिती शिंदेंच्या आरोपमुळे देशातील शहिदांचा अपमान झाला आहे. कारण भाजपा अशा विषयांमध्ये राजकारण करत नाही. (Praniti Shinde VS Ram Satpute Praniti Shinde accuses BJP of Pulwama attack Strong reply from Ram Satput)

हेही वाचा – Vijay Shivtare : अजित पवारांचा ब्रह्मराक्षस उल्लेख करत कार्यकर्त्याचं माघार घेणाऱ्या शिवतारेंना खरमरीत पत्र

- Advertisement -

भारतीय जनता पार्टी ही एक देशभक्त पार्टी आहे. त्यामुळे भाजपा अशा विषयांमध्ये राजकारण करत नाही. पुलावमा हल्ला पाकिस्तानने केला. त्यामध्ये भारताचे जवान शहीद झाले. प्रणिती शिंदे यांनी जे आरोप केलेत त्या देशातील शहिदांचा अपमान आहे. या देशासाठी ज्यांनी रक्त सांडले त्यांचा हा अपमान आहे. निवडणुका येतील जातील मात्र ज्यांनी या देशासाठी रक्त सांडलं तुम्ही त्यांच्याबद्दल बोलत आहात. ही विकृत मानसिकता आहे, ही मानसिकता ठेचली पाहिजे, सोलापूरकर ही मानसिकता याच मातीत येणाऱ्या काळात गाडतील. सोलापूरकर देशाशी गद्दारी कधीही सहन करणारे नाहीत, असं राम सातपुते म्हणाले.

सुशीलकुमार शिंदे यांच्यावर निशाणा साधताना राम सातपुते म्हटले की, सुशीलकुमार शिंदे हे ज्यावेळेस गृहमंत्री आणि मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी अतिरेक्यांचे तुष्टीकरण केले आहे. पोटामध्ये ज्यांच्यावर आरोप होते, राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेने ज्यांच्यावर आरोप केले होते, अशा अनेक आरोपींना सोडण्याचे काम त्यांनी केले आहे. तुष्टीकरणाच्या नावाखाली सुशीलकुमार शिंदे यांनी कायम देशासोबत गद्दारी केली आहे. त्याचा हिशोब त्यांना आता द्यावा लागेल. येत्या काळामध्ये आम्ही त्यांच्याकडे हिशेब मागणार, ज्यांना सोडलं त्यांची यादी दाखवणार, असा इशाराही त्यांनी दिला.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha 2024 : धाराशिवचे तिकीट भाजप, राष्ट्रवादी की शिवसेना शिंदे गट? सागर, देवगिरीवर जोर-बैठका

काँग्रेस उमेदवाराची मानसिकताचं तुष्टीकरणाची आहे, दृष्टीकरण करायचे आणि प्रसंगी देशाशी गद्दारी करायची ही यांची मानसिकता आहे. ही निवडणूक मी सोलापूरच्या विकासाच्या मुद्द्यावर लढत आहे. सोलापूरचा चारी बाजूने विकास झाला पाहिजे ही माझी भूमिका आहे. काँग्रेसचे नेते प्रचाराला जातं आहेत. ते अक्कलकोट, मंगळवेढा, पंढरपूरला ज्या रस्त्याने गेले ते भाजपाने तयार केले आहेत. जुलै महिन्यात सोलापूरचे विमानतळ सुरू होतं आहे. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांना आव्हान आहे की, तुम्ही धर्माला विरोध करता, पण मोदींच्या प्रयत्नने सुरू होणाऱ्या विमानतळमधून तुम्ही नक्कीच प्रवास कराल, असंही राम सातपुते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -