घरताज्या घडामोडीआमदार प्रसाद लाड शिवतीर्थावर, भेटीमागचं नेमकं कारण काय?

आमदार प्रसाद लाड शिवतीर्थावर, भेटीमागचं नेमकं कारण काय?

Subscribe

मुंबई जिल्हा बँकेतल्या निवडणुकी संदर्भातली ही माझी भेट होती. मुंबई जिल्हा बँकेमध्ये सर्व पक्षाच्या नेतृत्त्वाने सहकार पॅनेलसोबत जाण्याचा निर्णय घेतला. राजकीय अनिवेश बाजूला ठेऊन मुंबई जिल्हा बँकेची निवडणूक झाली पाहीजे असा आमचा प्रयत्न होता. त्याचबाबतीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मी भेट घेतली. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी फोनच्या माध्यमातून त्यांच्याशी बोलणं करून दिलं. त्यामुळे निश्चितपणे प्रविण दरेकर सुद्धा त्यांच्या भेटीला येतील अशी आमची अपेक्षा आहे. तसेच राज ठाकरे पण सहकार पॅनेलला येतील आणि ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी मदत होईल. असे भाजप आमदार प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे.

भाजप आमदार प्रसाद लाड यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.तेव्हा ते म्हणाले की, राजकीय उद्दीष्टाने पाहिलं तर सर्वच बाजूंनी बघता येईल. परंतु मी वेळोवेळी राज ठाकरे यांना भेटत असतो आणि आमची भेट होत असते. परंतु जेव्हा दोन राजकीय पक्ष व राजकीय नेते एकत्र भेटतात. तेव्हा राजकीय चर्चा ही नक्कीच होते. परंतु हा निर्णय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांचा आहे. त्यामु्ळे जिल्हा बँकेच्या बाबतीत मी सांगू शकतो. पुढचं मी सांगणं योग्य नाही.

- Advertisement -

भविष्यामध्ये निर्णय घेणार का ?

सध्यातरी याबाबत काही ठरलं नाहीये. तसेच गेल्यात महिन्यात देवेंद्र फडणवीस हे सुद्धा राज ठाकरे यांना भेटून गेले आहेत. त्यामुळे सध्या आमच्या समोर जिल्हा बँकेची निवडणूक आहे. त्याचप्रमाणे मुंबईमध्ये सहकार पॅनेल निवडणून आणणं गरजेचं आहे. त्याच्या प्रयत्नासाठी हा प्रयत्न होता. दुसरीकडे कोरोनाच्या काळात निवडणूका होणं किंवा सहकारामध्ये राजकारण आणण्यापेक्षा सर्वांनी एकत्र आलं पाहीजे.

ज्यापद्धतीने शिवसेना, काँग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आली त्यापद्धतीने मनसेला विश्वासात घेऊन सहकारामध्ये पुढची वाटचाल आणि दिशा बदलण्याचा प्रयत्न प्रविण दरेकर, नलावडे, सिद्धार्थ कांबळे, नंदू पाटकर आणि मी असं आम्ही पाच जणांच्या नेतृत्त्वात वेगवेगळे पक्षाचे नेतृत्त्व घेऊन राहण्याचा प्रयत्न करणार आहोत. सहकार हा शब्द ऐकमेकांना सहकार्य करण्यासाठी असतो. त्यामुळे तो पुढे चालू ठेवावा.

- Advertisement -

हेही वाचा: मुंबई विमानतळावर आरटीपीसीआरचे दर सर्वाधिक, महाराष्ट्राने लिहिले पत्र


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -