हा तर खोके विरुद्धचा ओके सामना; प्रसाद लाड यांची विरोधकांवर जळजळीत टीका

सत्ताधाऱ्यांनी सुद्धा विरोधकांविरुद्ध नारे दिले आहेत. याच संदर्भात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी विरोधकांवर बोचरी टीका केली आहे.

Prasad Lad

पावसाळी अधिवेशनाचा(adhiveshan) आजचा पाचवा दिवस आहे आणि आजच्या दिवशीही सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. पावसाळी अधिवेशनाचे मागील चारही दिवस विरोधकांनी 50- 50 चालो गुवाहाटी, गद्दार आले. सत्ताधाऱ्यांविरुद्ध अश्या घोषणा देऊंज विरोधकांनी विधान भवनाचा परिसर दणाणून सोडला होता. दरम्यान आता या सगळ्यावरच सत्ताधाऱ्यांनी सुद्धा चोख प्रत्युत्तर दिले आहे. सत्ताधाऱ्यांनी सुद्धा विरोधकांविरुद्ध नारे दिले आहेत. याच संदर्भात भाजपचे आमदार प्रसाद लाड(bjp mla prasad lad) यांनी विरोधकांवर बोचरी टीका केली आहे.

हे ही वाचा – उपमुख्यमंत्री साहेब गोलमाल उत्तर देऊ नका; विधानसभेतच आमदार सुहास कांदे फडणवीसांवर भडकले

प्रसाद लाड नेमकं काय म्हणाले

याच संदर्भांत विधान भवनाबाहेर माध्यमांशी बोलताना भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली. त्याच बरोबर ते असंही म्हणाले की, ”खोके विरुद्ध ओकेचा हा सामना होता”. ”ज्यांनी अडीच वर्षात भष्ट्राचार केला त्यांनी मागील 25 वर्षात मुंबई महापालिका सुद्धा लुटली. आणि एवढं असूनही ते जनतेला हेच दाखविण्याचा प्रयत्न करत आहेत की ते साधुसंत आहेत. त्या लोकांना आज सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे”. असंही प्रसाद लाड म्हणाले.
दरम्यान या सगळ्यावर सत्ताधारी सुद्धा विरोधकांवर आक्रमक झाले. आणि त्यांनी सुद्धा घोषणाबाजी करत विरोधकांवर हल्ला बोल केला.

हे ही वाचा – ”आम्हाला पाय लावायचा प्रयत्न केला तर…,” भरत गोगावलेंची थेट विरोधकांना धमकी

सत्ताधारी विरोधकांवर आक्रमक

दरम्यान पावसाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी सत्ताधारी नेते मंडळी यांनी सुद्धा विरोधकांविरोधात घोषणाबाजी केली. त्यावेळी “सचिन वाझेचे खोके, मातोश्री एकदम ओके”. ”लवासाचे खोके, बारामती ओके”. ”अनिल देशमुखांचे खोके, बारामती ओके”. ”नवाब मलिक, दाऊदचे खोके, मातोश्री ओके” अशा घोषणा देऊन सत्ताधारी सुद्धा मोठ्या प्रमाणावर आक्रमक झाले. या घोषणा देऊन आणि नारे बाजी करून आम्ही सत्य परिस्थिती समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोना काळात टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रयत्न ज्यांनी केला त्यांना एकदम ओके करण्याचं काम आम्ही सत्ताधाऱ्यांनी केला. असंही भाजपचे आमदार प्रसाद लाड(prasad lad) म्हणाले.

हे ही वाचा –  सत्ताधारी आमदारांनी शिवीगाळ केली; धक्काबुक्कीनंतर अमोल मिटकरींची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार