ठाणे : या वर्षांमध्ये एसटीच्या ताफ्यात स्वमलकीच्या तब्बल 2640 नव्या बसेस दाखल होत असून राज्यभरातील प्रत्येक रस्त्यावर नवी लालपरी धावताना दिसेल, असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. ते राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन करताना बोलत होते. (Pratap Sarnaik announces that 2640 new buses will be added to the ST fleet this year)
प्रताप सरनाईक म्हणाले की, स्वच्छतेबरोबरच सुरक्षित प्रवासाला महत्त्व देत राज्यातील एकूणच परिवहन सेवेचा चित्र बदलण्याचा “मास्टर प्लॅन” आपण बनवीत असून टप्प्याटप्प्याने एसटीच्या आधुनिकीकरणाला सुरुवात होईल. त्याचा पहिला लाभ एसटी कर्मचाऱ्यांना झाला पाहिजे. त्यांच्या गणवेशापासून ते विश्रामगृह आणि स्वच्छतागृहापर्यंत त्यांना मिळणाऱ्या प्रत्येक सुविधांचा दर्जा उंचावला पाहिजे. तरच आपण प्रवाशांना चांगल्या सुविधा देऊ शकतो, असे ते म्हणाले.
🗓 ११ जानेवारी २०२५ | 📍खोपट, ठाणे
आज महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आयोजित राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना, जानेवारी २०२५ आणि नवीन बसेसचे उद्घाटन माझ्या हस्ते पार पडले. रस्ता सुरक्षा जागृती हा उपक्रम महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकासाठी महत्त्वाचा ठरेल, यासाठी महामंडळाने… pic.twitter.com/lbVuiA6P8F
— Pratap Baburao Sarnaik (@PratapSarnaik) January 11, 2025
बहुप्रतीक्षित एसटीच्या स्वमालकीच्या नवीन लालपरी बसेस ताफ्यामध्ये दाखल होत असून आज 17 बसेसचे लोकार्पण मंत्री सरनाईक यांच्या हस्ते संपन्न झाले. जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत 150 लाल परी बसेस येणार असून त्या ठाणे शहर आणि ठाणे ग्रामीण भागातील आगारांना देण्यात येतील. त्यानंतर दर महिन्याला 300 एसटी बसेस दाखल होणार असून राज्यभरातील सर्व आगारांना या बसेस मिळतील अशी माहिती मंत्री सरनाईक यांनी दिली.
100 खाटांचे अद्यावत दवाखाने उभारणार
दरम्यान, एसटी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी बोरीवली येथे शंभर खाटांचे अद्यावत दवाखाने उभारण्यात येतील. ज्याठिकाणी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या सर्व सुविधा एसटी कर्मचाऱ्यांना मिळतील, अशी यंत्रणा निर्माण करण्यात येणार येईल, अशी घोषणाही मंत्री सरनाईक यांनी यावेळी केली.