घरमहाराष्ट्रप्रतापगडच्या बुरुजाची अवस्था बिकट

प्रतापगडच्या बुरुजाची अवस्था बिकट

Subscribe

प्रतापगड किल्याची अवस्था बिकट झाली असून प्रशासनाने वेळीच दुरूस्तीचे पावले न उचलल्यास हा अनमोल ठेवा नेस्तनाबूत होण्याची भीती निर्माण झाली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभारणी केलेल्या प्रतापगड किल्याची अवस्था बिकट झाली आहे. दिवसेंदिवस गडकिल्ल्यांचे दगड ढासळत असून वेळीच दुरूस्तीचे पावले न उचलल्यास हा अनमोल ठेवा नेस्तनाबूत होण्याची भीती निर्माण झाली आहे. ऐतिहासिक गड-किल्ल्यांच्या मूळ ठेव्यांकडेच दुर्लक्ष झाल्याने गडप्रेमींमधून नाराजी व्यक्त होत आहे. पौराणिक आणि ऐतिहासिक संदर्भ लाभलेले महाबळेश्‍वर हे महाराष्ट्रातील पर्यटकांचे आवडते पर्यटन स्थळ आहे. भोरप्या डोंगरावर शिवाजी महाराजांनी बुलंद किल्ला बांधला तो म्हणजे प्रतापगड. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यावर चालून आलेल्या अफजलखानाचा वध याच किल्ल्याच्या पायथ्याशी केला. हा इतिहास आजही जागा असला तरी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे प्रतापगड किल्याची दूरवस्था झाली आहे.

हेही वाचा – शिवस्मारकाचा खर्च पर्यटकांकडून वसूल करणार?

- Advertisement -

पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर

प्रतापगडा किल्यावर असणार्‍या उंचच्या उंच बुरुजांना भल्या मोठ्या वृक्षांनी जखडले आहे. गडावर जाण्यासाठी असणार्‍या पायर्‍याही तुटलेल्या आहेत. अनेक ठिकाणी मोठ-मोठे कडे आपली जागा सोडू लागले आहेत. अशी भयावह परिस्थिती प्रतापगडाची झालेली आहे. येथे शिवरायांच्या शौर्याची गाथा पाहण्यासाठी आणि ती ऐकण्यासाठी महाराष्ट्रभरातून अनेक इतिहाप्रेमी आणि पर्यटक या किल्ल्याला भेट देतात. मात्र, प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे येथे येणार्‍या पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्‍नही ऐरणीवर आला आहे. प्रतापगड पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांकडूनही गड-कोट किल्ल्यांचे पावित्र्य राखले जात नाही. पर्यटक किल्ला परिसरात पाण्याच्या मोकळ्या बॉटल, प्लास्टिक पिशव्या कचरा कुंडीत न टाकता, इतरत्र टाकत आहेत. त्यामुळे प्रतापगड किल्ला अस्वस्छतेच्या गर्तेत सापडला आहे.


हेही वाचा – पर्यटकाच्या मृत्यूनंतर महाबळेश्वरमध्ये घोडेस्वारी बंद; लाखोंचे नुकसान

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -