Wednesday, June 23, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी दरवेळी वरातीमागून घोडे नाचवणं बंद करुन मुंबईला सावरा, प्रवीण दरेकरांचा मुख्यमंत्र्यांवर टीका

दरवेळी वरातीमागून घोडे नाचवणं बंद करुन मुंबईला सावरा, प्रवीण दरेकरांचा मुख्यमंत्र्यांवर टीका

मुंबईकरांची थट्टा करु नका तुम्ही मुंबईकरांच्या पाठीशी उभे राहणार नाहीत

Related Story

- Advertisement -

मुंबईत पहिल्या पावसामध्येच सखल भागात पाणी साचून काही तासांकरता ठप्प झाली होती. यावरुन भाजप नेत्यांनी सत्ताधारी शिवसेना आणि महानगपालिकेच्या भोंगळ कारभारावर पुन्हा ताशेरे ओढले आहेत. दरवेळी वरातीमागून घोडे नाचवणं बंद करुन मुंबईला सावरा आशी विनंती भाजप नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभार आणि नालेसफाईमध्ये केलेल्या हाथ सफाईमुळे मुंबईकरांना पावसाळ्यात त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे.

मुंबईत तुडूंब पाणी भरले आहे. महापालिकेचं दुर्लक्ष झाल्यामुळे मुंबईची तुंबई झाली आहे. मुंबईकरांनी नेहमी पाऊस आणि हाय टाईड बघितला आहे. वर्षभराच्या कालावधीमध्ये याचे नियोजन आवश्यक होतं तं झालेलं नाही आहे. परंतु राहिलेल्या दिवसांत युद्धपातळीवर जी यंत्रणा कार्यान्वित करायची आहे. ती जरी केली तर मुंबईचे होणारे नुकसान रोखता येईल. मुंबईकर आताच कोरोनाच्या विळख्यातून सावरत आहेत कुठेतरी दुकाने कामधंदे पुन्हा सुरु होत आहेत यामध्ये असेच पावसात मुंबईत ठप्प झाली तर नागरिकांना पुन्हा त्रासाला सामोरं जावं लागेल असे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

दरम्यान दरेकर यांनी पुढे म्हटले आहे की, राजकारणाच्या पलिकडे विषय पाहिला पाहिजे. मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महानगरपालिकेत गेले होते. त्यांनी ५ ते १० मिनीट माहिती घेतली आहे. एवढ्या वेळात काय माहिती घेणार, काय सूचना देणार? काय उपाययोजना करणार? असे सवालही दरेकरांनी उपस्थित केला आहे. मुंबईकरांची थट्टा करु नका तुम्ही मुंबईकरांच्या पाठीशी उभे राहणार नाहीत तर मुंबईकर सहन करणार नाही.

महापालिकेला दोष देण्यापेक्षा आता उरलेल्या वेळेत तरी मुंबईला सावरा अशी विनंती प्रवीण दरेकर यांनी केली आहे. वरातीमागून घोडे नाचवायचे राज्य सरकार आणि पालिकेनं बद केले पाहिजे. मागील २० ते २५ वर्षांपासून त्याच त्याच ठिकाणी पाणी साचत आहे. या सगळ्याचं नियोजन झाले पाहिजे परंतु हे नियोजन झाले नाही आहे. नियोजन झालं तर विहित वेळेतही त्या गोष्टी पुर्ण झाल्या नाही आहेत. यामुळे मुंबईतील नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.

- Advertisement -