युवराजांच्या अयोध्या दौऱ्यासाठी एकनाथ शिंदेंना पाठवणे म्हणजे अवमूल्यन, प्रवीण दरेकरांची टीका

आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यासाठी संजय राऊत यांच्यासोबत एकनाथ शिंदे जातात. एकनाथ शिंदे माध्यमांशी बोलत नाहीत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वात जातात हा दुसरा आणखी एक प्रकार आहे. ज्यामुळे सच्चा शिवसैनिक सच्चे नेते यांचा अवमुल्यन करण्याचे काम या ठिकाणी सुरु आहे

praveen darekar on shivsena ayodhya tour
युवराजांच्या अयोध्या दौऱ्यासाठी एकनाथ शिंदेंना पाठवणे म्हणजे अवमूल्यन, प्रवीण दरेकरांची टीका

शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेमध्ये अवमूल्यन होत असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा १५ जून रोजी अयोध्या दौरा असणार आहे. या दौऱ्याच्या तयारीसाठी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वात मंत्री एकनाथ शिंदे आणि इतर शिवसैनिक अयोध्यामध्ये दाखल झाले आहेत. यावरुन प्रवीण दरेकर यांनी टीकास्त्र डागलं आहे. शिवसेनेत एकनाथ शिंदेंचे अवमूल्यन केल जात असल्याचे प्रवीण दरेकर म्हणाले आहेत. (Praveen Darekar criticizes on shivsena)

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. शिवसेनेचा १५ जून २०२२ रोजी अयोध्या दौरा आहे. आदित्य ठाकरे अयोध्या दौरा करणार असल्यामुळे तयारी सुरु करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे नेते अयोध्येत दाखल झाले आहेत. प्रवीण दरेकर म्हणाले की, आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यासाठी एकनाथ शिंदे यांनी तयारीला जावं हे शिवसेनेचे बदलत स्वरुप आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्या तालमीत तयार झालेले निष्ठावंत सैनिक, नेता आणि आज जो खऱ्या अर्थाने शिवसेनेला टिकवण्याचे काम करत आहे. उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याची तयारी मी समजू शकतो परंतु एकनाथ शिंदे यांचे अशा प्रकारे अवमूल्यन सुरु आहे. त्याच्यामुळे आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यासाठी संजय राऊत यांच्यासोबत एकनाथ शिंदे जातात. एकनाथ शिंदे माध्यमांशी बोलत नाहीत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वात जातात हा दुसरा आणखी एक प्रकार आहे. ज्यामुळे सच्चा शिवसैनिक सच्चे नेते यांचा अवमुल्यन करण्याचे काम या ठिकाणी सुरु आहे.

शिवसेना नेते अयोध्येत दाखल

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अयोध्या दौऱ्याची माहिती दिली आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी महाराष्ट्रातील नेते अयोध्यामध्ये दाखल झाले आहेत. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, युवासेना नेते वरुण सरदेसाई आणि अनिल तिवारी अयोध्यामध्ये दाखल झाले आहेत. ज्या ठिकाणी राम मंदिराचे काम सुरु आहे त्या ठिकाणी भेट दिली. तसेच रामलल्लाचे दर्शन घेतले असल्याची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. संजय राऊत यांनी ट्विट करत या दौऱ्याविषयी माहिती दिली असून त्यांचे फोटोसुद्धा शेअर केले आहेत.


हेही वाचा : राज ठाकरेंवरील शिराळा कोर्टाचं वॉरंट मुंबई पोलिसांना प्राप्त, वॉरंट रद्द करण्यासाठी राज हजर राहणार का?