पवारांनी कुटुंबातील मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करावा, दरेकरांचे थेट आव्हान

खासदार सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्या मनात कुठल्या कोपऱ्यात मुख्यमंत्रीपदाची ओढ आहे. याबाबत त्यांनी सांगावे. कुटुंबातीला उमेदवाराचे नाव निश्चित करा आणि मग हयात नसलेल्या गोपीनाथ मुंडेंबाबत वक्तव्य करा अशी तंबी प्रवीण दरेकर यांनी दिली आहे.

Praveen darekar slams rohit Pawar announce the chief ministerial candidate of the family
पवारांनी कुटुंबातील मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करावा, दरेकरांचे थेट आव्हान

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पहिले पवार कुटुंबातील मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण ते जाहीर करावं असे आव्हान प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी केले आहे. भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. रोहित पवार यांनी दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर दरेकरांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच हयात नसलेल्या व्यक्तीबद्दल बोलून वाद निर्माण करणं महत्त्वाचे नाही असे प्रवीण दरेकर म्हणाले.

भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी राष्ट्रवादी आमदार रोहित पवारांचा समाचार घेतला आहे. रोहित पवार अजून लहान आहेत. तसेच हयात नसलेल्या वक्तींचा वापर करुन वाद निर्माण करणं महत्त्वाचे नाही. पवार कुटुंबातील मुख्यमंत्री पदासाठी उमेदवार कोण याबाबत रोहित पवारांनी जाहीर करावं. उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्या मनात कुठल्या कोपऱ्यात मुख्यमंत्रीपदाची ओढ आहे. याबाबत त्यांनी सांगावे. कुटुंबातील उमेदवाराचे नाव निश्चित करा आणि मग हयात नसलेल्या गोपीनाथ मुंडेंबाबत वक्तव्य करा अशी तंबी प्रवीण दरेकर यांनी दिली आहे.

रोहित पवार नेमकं काय म्हणाले?

आमदार रोहित पवार यांनी एका कार्यक्रमादरम्यान दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याबाबत वक्तव्य केले होते. राज्यात २०१४ मध्ये जनतेच्या मनातील मुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे होते परंतु तसं घडलं नाही. आज आपल्यासोबत ते नाहीत. जर ते असते तर राजकारणाची पातळी खालच्या स्तरावर गेली नसती. राजकारणात विरोध झाला असता, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत वाद झाला असता परंतु संस्कृती आणि पातळी सोडून कोणी बोललं नसते. आज ते नसले तरी आमच्या आणि तुमच्या मनात, विचारात आहेत. त्यांचा विचार घेऊन आपण काम केले पाहिजे. त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि नगरविकास मंत्री धनंजय मुंडे काम करत आहेत असे रोहित पवार म्हणाले होते.


हेही वाचा : तुम्ही कितीही टाळ्या वाजवा आता मी अजिबात चुकणार नाही, अजित पवारांना आठवलं धरणाबाबतचं वक्तव्य