महाविकास आघाडीतील असंतोष संजय राऊतांना भोवला, दरेकरांचा राऊतांच्या क्रमांकावरुन घणाघात

शिवसेना खासदार संजय राऊत जे प्रथम क्रमांकाचे उमेदवार होते ते सहाव्या क्रमांकावर गेले त्यांच्यापेक्षा जास्त मत धनंजय महाडिक यांना मिळाली.

praveen darekar slams sanjay raut on drops number in Rajya sabha Election
महाविकास आघाडीतील असंतोष संजय राऊतांना भोवला, राऊतांचा क्रमांक घसरणीवर दरेकरांचा घणाघात

राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना खासदार संजय राऊत विजयी झाले आहेत. परंतु त्यांना मोठा फटका या निवडणुकीत बसला असल्याचे दिसत आहे. संजय राऊत शिवसेनेकडून पुन्हा एकदा राज्यसभेवर खासदार म्हणून गेले आहेत. परंतु राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये संजय राऊत सहाव्या क्रमांकाचे उमेदवार म्हणून निवडून आले आहेत. यावरुन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी टीकास्त्र डागलं आहे. महाविकास आघाडीमध्ये असलेला असंतोष संजय राऊत यांना भोवला आहे. या असंतोषामुळे राऊतांची मोठी घसरण झाली असल्याचे टीकास्त्र प्रवीण दरेकर यांनी डागलं आहे.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्यसभा निवडणुकीनंतर आपली प्रतिक्रिया देताना महाविकास आघाडीवर टीकास्त्र डागलं आहे. तर शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरसुद्धा निशाणा साधला आहे. प्रवीण दरेकर यांनी टीकास्त्र डागलं आहे. राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये ७ उमेदवारांमध्ये शिवसेना खासदार संजय राऊत जे प्रथम क्रमांकाचे उमेदवार होते ते सहाव्या क्रमांकावर गेले त्यांच्यापेक्षा जास्त मत धनंजय महाडिक यांना मिळाली. त्यामुळे केवळ राणा भिमदेवी थाटात टीका, वक्तव्य करुन मतं मिळत नाहीत. तिन्ही पक्षात असंतोष होता तोही संजय राऊतांना निश्चितच भोवला आहे. असे प्रवीण दरेकर म्हणालेत.

आमदारांना घोडेबाजारात उभं करण्याचे शिवसेनेचं काम

प्रवीण दरेकर पुढे म्हणाले की, आपला पराभव आणि समोरच्याचा विजय हा दिलदारपणे आपण स्वीकारला पाहिजे. आमदारांना घोडेबाजारात उभे करुन आपण त्यांचा अवमान करीत आहात. ते काही विकाऊ वस्तू नाहीत आणि आमदारांनाही ते आवडलेले नाही. 3 लाख मतदारांचे प्रतिनिधित्व करणार्‍या अशा प्रगल्भ आमदारांना घोडेबाजारात उभे करण्याचे काम शिवसेनेचे खासदार संजय राऊत व शिवसेनेने केले आणि त्याचा दणका त्यांना बसला असे प्रवीण दरेकर म्हणाले.

कौरवांच्या अमानुष बेबंदशाहीला ठेचून काढले

राज्यसभा निवडणुकीतील मतमोजणी रात्री उशिरापर्यंत सुरु होती. भाजपचे दोन उमेदवारांचा विजय निश्चित झाल्यानंतर तिसऱ्या आणि राज्यसभेच्या सहाव्या जागेवर भाजपने विजय मिळवला. शिवसेना उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला आहे. यानंतर प्रवीण दरेकरांनी टीकास्त्र डागलं आहे. कौरवांच्या अमानुष बेबंदशाहीला ठेचून काढले, तिघाडीच्या पतनाला आता सुरुवात झाली असा इशारा प्रवीण दरेकर यांनी केला आहे.


हेही वाचा : ही तर विजयाची सुरुवात, लोकसभा आणि विधानसभाही स्वबळावर जिंकू; देवेंद्र फडणवीसांचा निर्धार