मुख्यमंत्र्यांनी घराबाहेर पडून ३ जिल्ह्यांना ३ तास दिल्याबद्दल आभार, प्रवीण दरेकर यांचा टोला

मुख्यमंत्र्यांचा 'हा' खऱ्या अर्थाने 'वादळी' दौरा!

pravin Darekar alleged that Sharma was behind Waze Pradip Sharma was expected to be arrested
मुंबईकरांची थट्टा करु नका तुम्ही मुंबईकरांच्या पाठीशी उभे राहणार नाहीत

कोकणात २ ते ३ तासात काय कोकणवासियांच्या व्यथा समजणार आहात. इथे येऊन विमानतळावर बैठका घेण्यापेक्षा मुंबईतच सगळ्या अधिकाऱ्यांना का नाही बोलावले अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. मुख्यमंत्री यांनी आज तीन तासाचा सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मागील २ दिवसांपासून पाहणी दौरा करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा फक्त केवळ ‘दर्शनाचा कार्यक्रम’ होता अशी टीका प्रवीण दरेकरांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर मागील २ दिवसांपासून रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्याचा पाहणी दौरा करत आहेत. परंतु मुख्यमंत्र्यांनी घराबाहेर पडून ३ जिल्ह्यांना ३ तास दिल्याबद्दल आभार आसो टोलाही दरेकरांनी लगावला आहे.

दरेकरांनी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर जाहीर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांना कोकणात २ ते ३ तासात काय कोकणवासियांच्या व्यथा समजणार आहात. तर इथे येऊन विमानतळावर बैठका घेण्यापेक्षा मुंबईतच सगळ्या अधिकाऱ्यांना का नाही बोलावले? कोकणच्या जनतेने सातत्याने शिवसेनेला पाठबळ दिलं. त्या अनुषंगाने कोकणचा भरीव विकास होईल, अशी कोकणवासीयांची अपेक्षा होती. मात्र कोकणच्या जनतेच्या अपेक्षा मातीत घालण्याचं काम ह्या महाविकास आघाडी सरकारने केलं आहे. असे वक्तव्य विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केले आहे.

कोकणात चक्रीवादळ नुकसानीची पाहणी!

विरोधी पक्ष नेते… ‘तीन दिवस’, मुख्यमंत्री…’तीन तास’ विरोधी पक्ष नेते – कोकणवासीयांच्या बांधावर, उंबरठ्यावर जाऊन विचारपूस तर मुख्यमंत्र्यांचा -केवळ ‘दर्शनाचा कार्यक्रम’

मुख्यमंत्र्यांचा ‘हा’ खऱ्या अर्थाने ‘वादळी’ दौरा!

वादळ येण्यापूर्वी जसे ३ दिवस प्रशासन कामाला लागते तसेच आताही झाले. या ‘वादळा’ने फक्त ३ तासात धूळधाण केली. या ‘वादळा’मुळे कोकणात इतकी पानं पडली की आता लोकांच्या तोंडाला पुसायला पण पानं शिल्लक राहिली नाहीत. आपल्या व्यस्त कार्यक्रमातून घराबाहेर पडून, कोकणातील ३ जिल्ह्यांना मिळून तब्बल ३ तास दिल्याबद्दल मुख्यमंत्र्याचे आभार असा टोला प्रवीण दरेकर यांनी ट्विट करत लगावला आहे.