अधिवेशन जवळ आल्यावरच कोरोना रुग्णांचे आकडे कसे वाढतात, दरेकरांचा सवाल

पळवाट न काढता किमान १५ दिवस अधिवेशन घ्यावं अशी मागणी दरेकर यांनी केली आहे.

pravin darekar
विनाअनुदानित शाळेतील ५० हजार शिक्षकांना तात्काळ मदत द्या, दरेकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली आहे. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही कायम आहे.कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार पाहायला मिळत असला तरी कोरोनाबाधितांची संख्या ही मागील महिन्याभरापासून ७०० च्या घरात आहे. परंतु अधिवेशन जवळ येताच कोरोनाबाधितांच्या आकड्यांमध्ये कशी काय वाढ होते? असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. तसेच जनतेच्या प्रश्नांसाठी १५ दिवसांचे अधिवेश घेण्यात यावं अशीही मागणी प्रवीण दरेकर यांनी केली आहे. मागील वेळीही कोरोनाच्या संकटामुळे आणि वाढत्या कोरोनारुग्णांच्या आकड्यामुळे अधिवेशन कमी दिवसांत आटोपलं होतं तसेच आता होत असल्याचे चित्र दिसत आहे.

मागील वर्षी कोरोनाचं संकट असल्यामुळे पावसाळी अधिवेशन आटोपतं घेतलं होते आताही कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढताना दिसत असल्यामुळे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारला सवाल केला आहे. राज्यातील अधिवेशन जवळ येताच कोरोना रुग्णाचे आकडा कसा वाढतो? असा सवाल करण्यात आला आहे. पावसाळी अधिवेशनात आर्थिक आणि समाजिक विषयांवर चर्चा होण्याची गरज आहे. तसेच अधिवेशन हे १५ दिवसांचे घ्यावे अशी मागणी दरेकर यांनी केली आहे.

भाजप नेत्यांची बैठक घेण्यात येणार असून या बैठकीत अधिवेशनातील मुद्द्यांवर आणि प्रश्नांवर चर्चा करण्यात येणार आहे. राज्य सरकार अधिवेशनापासून पळवाट काढत आहे. परंतु अशी पळवाट न काढता किमान १५ दिवस अधिवेशन घ्यावं अशी मागणी दरेकर यांनी केली आहे.

अधिवेशनात सरकारची गच्छंती

अधिवेशनात राज्य सरकारला मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, पदोन्नती आरक्षण, नेत्यांवरील भ्रष्टाचाराचे आरोप, सरकारमधील समन्वय, नाले सफाई अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात येणार असल्याचा इशारा दरेकर यांनी दिला आहे. प्रदीप शर्मा आणि वाझे प्रकरण पुन्हा अधिवेशनात गाजण्याची शक्यता आहे.