घरताज्या घडामोडीगनिमी काव्याने सरकार आणणार, दरेकरांचा सत्ता स्थापनेचा मोठा दावा

गनिमी काव्याने सरकार आणणार, दरेकरांचा सत्ता स्थापनेचा मोठा दावा

Subscribe

वेळ आल्यावर आम्ही सत्तेत कधी येणार तेही सांगणार...

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. अशावेळीच सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून सरकारची उपलब्धी सांगितली जात आहे. तर दुसरीकडे भाजप नेत्यांकडून राज्य सरकारवर निशाणा साधत टीकास्त्र सोडले जात आहेत. दरम्यान, देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात भाजप सरकार नक्की येणार आणि वेळ आल्यावर आम्ही सत्तेत कधी येणार तेही सांगणार. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्यानं वागणार, असा इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिला आहे.

वेळ आल्यावर आम्ही सत्तेत कधी येणार तेही सांगणार

राज्यातील सत्तांतरासंदर्भात प्रवीण दरेकरांनी मोठा दावा केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी जनतेनं आम्हाला आपलं मानलं. असं सांगितलं होतं. परंतु सरकारनं जनतेला आपलं मानलं नाही. २ वर्षात राज्यात सरकार नावाची चीज अस्तित्वातच नाहीये. परंतु यातून मार्ग काढू शकतं ते फक्त आमचं सरकार, असे प्रविण दरेकर म्हणाले. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात भाजप सरकार नक्की येणार आणि वेळ आल्यावर आम्ही सत्तेत कधी येणार तेही सांगणार. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्यानं वागणार, असं आवाहन प्रविण दरेकर यांनी केलं आहे.

- Advertisement -

देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात भाजप सरकार नक्की येणार आहे. परंतु अशा गोष्ट जाहीरपणे सांगायच्या नसतात. कारण की आम्ही कधी येणार हे सांगितल्यावर ते अधिकच घटट् होईल. त्यानंतर वाद-विवाद सुरू होतात. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याने काही गोष्टी व्हायला पाहिजेत. असं दरेकरांनी म्हटलं आहे.

राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात वैयक्तिक भेट

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नवीन निवासस्थानी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली होती. त्यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. परंतु त्यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण देखील आलं. परंतु फडणवीस आणि राज ठाकरे यांची ती भेट वैयक्तिक होती. फडणवीसांना जेवणासाठी आमंत्रण देखील देण्यात आलं होतं. परंतु मनसेबाबत अद्यापही युतीची चर्चा झाली नसल्याचं दरेकर यांनी सांगितलं आहे.

- Advertisement -

छगन भुजबळ पालकमंत्री झाल्यानंतर शहरातील गुन्हेगारी वाढली आहे. तसेच या प्रकरणात मोक्का आणि फाशीची शिक्षा अपेक्षित आहे. कारण आरोपी बाहेर आल्यानंतर कायद्यावर विश्वास राहणार नाही. असं म्हणत दरेकरांनी भुजबळांवर हल्लाबोल केला आहे.


हेही वाचा: जगभरात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा धुमाकूळ, गंभीर आजारग्रस्त व्यक्तींना मोठा धोका


नाशिक मधील सातपूर भाजपा मंडल अध्यक्ष अमोल इघे यांच्या निधनानंतर आज त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली व कुटुंबियांचे सात्वंन केले. यावेळी नाशिकचे महापौर, आमदार आणि शहर अध्यक्ष आदी पदाधिकारी उपस्थित होते. या संदर्भात त्यांनी ट्विट देखील केलं आहे.

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -