घरताज्या घडामोडीCruise drug bust : जावयावर कारवाईने नवाब मलिकांचा NCB वर राग -...

Cruise drug bust : जावयावर कारवाईने नवाब मलिकांचा NCB वर राग – प्रवीण दरेकर

Subscribe

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने ड्रग्ज प्रकरणात क्रूझवर केलेल्या कारवाईदरम्यानचे भाजप कनेक्शन आता समोर आले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आर्यन खानसोबत दिसणाऱ्या मनीष भानुशाली आणि किरण गोसावी व्यक्तींचा भाजपशी आणि गुजरात ड्रग्ज प्रकरणाशी कसा संबंध आहे ? याबाबतचा खुलासा केला आहे. एकुणच या प्रकरणातील भाजप कनेक्शन आज नवाब मलिक यांनी फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले. पण भाजपकडूनही नवाब मलिक यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया आली आहे.

नवाब मलिक यांचे आरोप बिनबुडाचे आहेत. प्रत्येक गोष्टी राजकीय दृष्टीकोनातून बोलण्याचे त्यांचे काम असते. भारतीय जनता पक्षासाठी द्वेषाने ते पछाडलेले आहेत. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) च्या बाबतीत त्यांचा पोटशूळ आणि राग समजू शकतो, कारण त्यांच्या जावयावर एनसीबीने कारवाई केली आहे. यानिमित्ताने एनसीबीला दोष देता येतो का ? त्यांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करता येतो का असा सगळा केवीलवाणा प्रयत्न नवाब मलिक यांनी केला असल्याची प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

- Advertisement -

नवाब मलिक यांचे राजकारण भाजप द्वेषाने पछाडले आहे. राजकीय टीका करा पण देशातील तपास यंत्रणांवर अजुनही जनतेचा विश्वास आहे. सीबीआय, ईडी आणि एनसीबी या तपास यंत्रणांविरोधात अविश्वास दाखवणे हे देशाच्या दृष्टीने घातक आणि धोक्याचे असल्याचेही ते म्हणाले. राजकारणाने प्रेरित झालेल्या मंडळींच्या लक्षात ही बाब येत नाही. नार्कोटिक्स विभागाचा या प्रकरणाशी संबंध असेल तर त्याबाबतचे ते स्पष्टीकरण देतील. नवाब मलिक यांनीच एनसीबीला खोट ठरवून टाकले. निर्णय घेऊन टाकला, फोटोंची सत्यता तपासली नाही. तपास यंत्रणेसाठी हे अतिशय घातक आहेत.


हेही वाचा – Cruise drug bust : क्रूझ कारवाईतील मनीष भानूशालीचे भाजप कनेक्शन, मोदी, शाह, फडणवीसांसोबत फोटो

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -