घरताज्या घडामोडीनवाब मलिकांच्या डोक्यावर परिणाम, मानसोपचाराची आवश्यकता, प्रवीण दरेकरांची टीका

नवाब मलिकांच्या डोक्यावर परिणाम, मानसोपचाराची आवश्यकता, प्रवीण दरेकरांची टीका

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक मागील काही दिवसांपासून भाजप नेते आणि एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर बेछूट आरोप करत आहेत. मलिकांच्या डोक्यावर परिणाम झाल्यासारखे दिसत असून त्यांना मानसोपचार तज्ज्ञांकडे तपासणीची आवश्यकता असल्याची खोचक टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. नवाब मलिकांनी मंत्री म्हणून संविधानातील गुप्ततेच्या अटीचा भंग केला असल्याचा आरोप दरेकरांनी केला आहे. नवाब मलिकांचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणीही दरेकरांनी केली आहे.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकांवर टाकास्त्र डागलं आहे. दरेकरांनी म्हटलं आहे की, नवाब मलिकांच्या डोक्यावर परिणाम झालेला दिसतो आहे. कारण रोज सकाळी उठल्यावर कुठलातरी फोटो शोधायचा, ट्विट करायचे आणि सनसनाटी निर्माण करायची आशा प्रकारची त्यांची कामगिरी गेल्या काही दिवसांपासून दिसत आहे. मंत्री म्हणून शपथ घेताना संविधानाने ज्या काही चौकट आणि अटी गुप्ततेच्याबाबतीत घातल्या आहेत त्याचा भंग होताना दिसत आहे. वैयक्तिक आरोप, जतीवर बोलण हे भंग असल्याचे माझे मत आहे. आशा प्रकारे गुप्ततेचा भंग या सगळ्या गोष्टीचा विचार करुन नवाब मलिकांचा राजीनामा घेतला पाहिजे. कारण समीर वानखेडे मुस्लिमच आहे. असा अट्टहास कशासाठी पाहिजे. नवाब मलिक यांनी शपथ घेतल्याचा भंग केला असल्यामुळे त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे.

- Advertisement -

नवाब मलिकांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही

नवाब मलिक न्यायाधीश नाहीत त्यामुळे नवाब मलिक जे बोलतात ते आरोप सत्य आहेत असं नाही. मी जर आरोप केला नवाब मलिकांचे पेडलरशी संबंध आहेत. नवाब मलिक ड्रग्ज विकतात. नवाब मलिकांच्या आरोपांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही. नवाब मलिकांचा आरोप म्हणजे न्यायाधीशांचा निर्णय अशा अविर्भावाने हे येताना दिसत असल्याचे प्रवीण दरेकर म्हणाले.

मलिकांचे वैफल्यातून किळसवाणं राजकारण

दरेकर म्हणाले की, मला खात्री आहे की, नवाब मलिकांना मानसोपचार तज्ज्ञांकडे तपासणीची आवश्यकता आहे. त्यांच्या डोक्यावर परिणाम झाल्यासारखी वक्तव्ये रोज ते करत आहेत. नेत्यांच्या वैयक्तीक कुटुंबापर्यंत जाऊन किळसवाण्या टीका करण्याचे काम सुरु आहे. नवाब मलिक आपल्या वैफल्यातून अत्यंत किळसवाण असं राजकारण करत आहेत अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : देवेंद्र फडणवीसांवरील आरोपांचे परिणाम नवाब मलिकांना भोगावे लागणार, चंद्रकांत पाटलांचा इशारा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -