Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी शिवसेनेची बांधिलकी संजय राऊतांची तपासावी, सत्ताच प्राणवायू असल्याचा दरेकरांची टीका

शिवसेनेची बांधिलकी संजय राऊतांची तपासावी, सत्ताच प्राणवायू असल्याचा दरेकरांची टीका

Subscribe

राऊतांना इतर विषायवर बोलण्यास वेळ नाही

विधानपरिषदेचा १२ सदस्यांच्या नियुक्तीचा विषय हा न्यायप्रविष्ठ आहे. न्यायालयात आहे. त्यामुळे थोडी थांबण्याची आवश्यकता आहे. अनिल गलगली यांनी माहिती मागितल्यानंतर या प्रकारची फाईल नसल्याची माहिती मिळाली आहे. यांनी नावच दिली आहे की नाही अशी शंका आहे. यामध्ये कोणती नावे दिली आहेत. याबाबत त्या १२ नावांची माहिती राज्य सरकारने द्यावी. १२ लोकांच्या बदल्यामध्ये ५० लोकांना तुम्हाला विधानपरिषदेवर पाठवतो अशा प्रकारचे आश्वासन देण्यात आले आहे. यामुळे जर पेपर लिक झाला तर इतर सदस्य काय प्रतिक्रिया देतील यामुळे जेवढे गुलदस्त्यात हे प्रकरण ठेवता येईल तेवढे फायद्याचं ठरणार आहे. त्यामुळे सरकारने ही नावे जाहीर करावी असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.

राऊतांना इतर विषायवर बोलण्यास वेळ नाही

राज्यात २ कोटी विद्यार्थी शिक्षण घेत आहे. पालक विद्यार्थी, इतर विद्यार्थ्यांना पकडून हि संख्या ५ कोटीच्या आसपास आहे. ते सर्वच आज चिंताग्रस्त आहेत. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांना बोलायला वेळ नाही. कोकणातील वादळात नुकसान झालेल्या नुकसाग्रस्त नागरिकांना १ रुपयाची मदत मिळाली नाही आहे. त्यावरही त्यांना बोलायला वेळ नाही परंतु १२ आमदारांबाबत बोलायला संजय राऊतांना वेळ आहे.

राज्य सरकारची कुवत नाही

- Advertisement -

कोरोना लसींच्या बाबतीत संजय राऊत यांनी राज्यपालांनी केंद्र सरकारसोबत बोलावं असा सल्ला दिला आहे. मदतीच्या बाबतीत केंद्र सरकारकडे पत्राने मागणी होत नाही त्यासाठी प्रस्ताव राज्य सरकारकडून जात असतो. यांनी प्रस्ताव पाठवायचा नाही परंतु राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी बोलाव अशी अपेक्षा असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. याचा अर्थ राज्य सरकारवर संजय राऊतांचा भरोसा नाही. राज्य सरकारची कुवत नसल्यामुळे राज्यपालांना बोलायाल सांगितले जात आहे का? असा घणाघात प्रवीण दरेकरांनी केला आहे.

भाजपचा प्राणवायू संपेल अशा प्रकारचा हिताला सल्ला संजय राऊत यांनी दिला आहे. भाजपचा प्राणवायु प्रचंड आहे. देशातील जनेतेने भाजपला जनाधार देऊन भाजपचा सतत प्राणवायु वाढवणयाचे काम केले आहे. अलिकडे पंढरपुरात विठ्ठलाच्या भूमिवरही तिथल्या जनतेले प्राणवायू वाढवला आहे. आपल्या नाकातोंडातल्या नळ्या काढून घेतल्या आहेत. अशी तिरस्कारातून भूमिका येत असेल तर दुर्दैवी असल्याचे प्रवीण दरेकरांनी म्हटले आहे.

सत्ताच शिवसेनेचा प्राणवायु

- Advertisement -

शिवसेनेची सामाजीक बंधिलकी हा शिवसेनाचा प्राणवायू होता. अलिकडच्या काळात ती बांधिलकी आहे का हे संजय राऊतांना तपासले पाहिजे. निसर्ग वादळ, तौत्के चक्रीवादळ झाले कुठेही शिवसेना कोकणात दिसली नाही, कोरोना झाला कुठेही शिवसेना कोकणात दिसली नाही. रस्त्यावर दिसली नाही. भाजप कौले, कापडं, पत्रे देऊन मदत करत आहे. कधीकाळी शिवसेना आपत्ती झाली की, वस्तु धान्य गोळा करुन नुकसान झालेल्या भागात पोहचायचे परंतु आता सत्ता हे प्राणवायु झाले आहे. सत्ता ही क्षणीक असते शिवसेनेचा प्राणवायु हरपला आहे. त्यामुळे ऑक्सिजनविना शिवसेना अशा प्रकारची चालली आहे. यामुळे याची चिंता संजय राऊत यांनी जास्त करावी अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -