घरताज्या घडामोडीपालघर साधू हत्याकांड: शिवसेनेच्या हिंदुत्वाची धार बोथट, प्रवीण दरेकरांची टीका

पालघर साधू हत्याकांड: शिवसेनेच्या हिंदुत्वाची धार बोथट, प्रवीण दरेकरांची टीका

Subscribe

हिंदुत्वाचे तेजस्वी रूप बाळासाहेब ठाकरे यांनी झळाळते ठेवले होते.

हिंदुत्वाच्या विचारांचा विसर पडल्यामुळे शिवसेनेचे पालघरच्या साधू हत्याकांडाकडे दुर्लक्ष झाले. केवळ सत्तेसाठीच शिवसेनेच्या हिंदुत्वाची धार बोथट झाली आहे, अशी जळजळीत टीका विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी शुक्रवारी केली. पालघर जिल्ह्यातील साधू हत्याकांडाचा तपास गतीने पूर्ण करून दोषींना शिक्षेपर्यंत मिळावी म्हणून महाविकास आघाडीच्या सरकारने आवश्यक ती पावले न उचलल्यामुळे आज एक वर्ष पूर्ण झाले तरी या घटनेत न्याय मिळू शकला नाही असा आरोपही यावेळी विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला.

डहाणूतील गडचिंचले गावातील जमावाने दोन साधू आणि त्यांच्या वाहनचालकाची झालेल्या हत्येला आज एक वर्ष पूर्ण झाले. यानिमित्ताने दरेकर यांनी आज मंत्रालय जवळच्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर लाक्षणिक आंदोलन केले. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना दरेकर यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. हिंदुत्वाच्या आचार-विचारांची कास धरत हिंदुत्वाचे तेजस्वी रूप बाळासाहेब ठाकरे यांनी झळाळते ठेवले होते.

- Advertisement -

त्यांनी हिंदुत्वासाठी मशाल पेटवली होती. आज सत्तेवर त्यांचेच सुपुत्र असताना ही मशाल विझली असून त्याचा धूर होताना दिसतो आहे, असा टोलाही दरेकर यांनी लगावला. उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या विचारांची कास धरत हत्याकांडावरील आपले मौन सोडावे आणि सरकारचे प्रमुख म्हणून भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही दरेकर यांनी केली.

पालघर साधू हत्याकांडाची त्रयस्त एजन्सीमार्फत चौकशी झाली, तरचं साधूंना न्याय मिळू शकेल. प्रवीण दरेकर यांनी आज मंत्रालयाजवळ राज्य सरकार विरोधात लाक्षणिक उपोषण केले.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -