घरमहाराष्ट्रकेंद्राकडे बोट दाखवण्यापेक्षा राज्यातले नियोजन व्यवस्थित करा - प्रवीण दरेकर

केंद्राकडे बोट दाखवण्यापेक्षा राज्यातले नियोजन व्यवस्थित करा – प्रवीण दरेकर

Subscribe

काय म्हणाले होते नवाब मलिक

देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. वाढत्या कोरोनाबाधित रुग्णांसाठी मोठ्या प्रमाणात रेमडेसिवीरच्या पुरवठ्याची मागणी होत आहे. रेमडेसिवीरचा तुटवडा असताना भाजपशासित प्रदेश गुजरातमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनचे मोफत वाटप केले जात आहे. यावरुन राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी गुजरातच्या भाजप कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात रेमडेसिवीरचा साठा असल्याचा आरोप केला आहे. यावर भाजप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी नवाब मलिक यांना प्रत्युत्तर दिले आहे. केंद्राकडे बोट दाखवण्यापेक्षा राज्यातले नियोजन व्यवस्थित करा दुसऱ्याच्या ताटात काय वाढले आहे हे पाहण्यापेक्षा आपले ताट रिकामं आहे. याकडे लक्ष द्या असे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.

राज्यातील आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावेत! दुसऱ्याच्या ताटात काय वाढलंय, हे पाहण्यापेक्षा आपलं ताट रिकामं आहे! राज्यात आरोग्य व्यवस्थेत असलेल्या कमतरतेवर यांनी बोलावं असे ट्विट भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केले आहे. तसेच पुढे दरेकर म्हणाले की, नवाब मलिक यांचे बोलणं तथ्यहीन आहे उलट ते मोफत रेमडेसिवीर देत आहेत त्यांचं कौतुक केले पाहिजे ते त्यांच्या राज्याची काळजी घेत आहेत. तुम्ही जाऊन गुजरात किंवा कर्नाटकची काळजी घेणार आहेत का? इथल्या व्यवस्था उभं करणं आपली जबाबदारी आहे. केवळ माझं कुटुंब माझी जबाबदारी म्हणून चालणार नाही. त्या कुटुंबासाठी जबाबदारीने वागले पाहिजे. जे जबाबदारपणे नवाब मलिक यांच्या सारखे मंत्री बोलताना दिसत आहेत. आहेत त्या व्यवस्था राज्य सरकारने मजबूत कराव्यात दुसऱ्याच्या ताटात काय वाढलंय हे पाहण्यापेक्षा आपलं ताट रिकामं आहे. आज लोकांना मदतीची गरज आहे. रेमडेसिवीर, व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन यावर बोललं पाहिजे. केंद्र सरकार, पंतप्रधान मोदी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलण्यात वेळ घालवण्यापेक्षा राज्यातील नियोजन व व्यवस्थेत वेळ घालवावा असे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

काय म्हणाले होते नवाब मलिक

देशामध्ये रेमडेसिवीरचे औषधाचा तुटवडा असताना सुरतमधील भाजपाच्या कार्यालयात हेच औषध मोफत वाटले जात आहे. प्रशासकीय यंत्रणांना डावलून जर राजकीय पक्षाच्या माध्यमातून औषधांचे वाटप होत असेल तर हे राजकारण नाही तर काय आहे?सुरतच्या भाजप कार्यालयात रेमडेसिवीरचा मोफत वाटप कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. राजकीय पक्षाच्या कार्यालयातून जर हे औषधांचे वाटप होत असेल तर ही औषधे कुठून आली ? औषधांच्या माध्यमातून राजकारण सुरू झालेले आहे, हे योग्य नाही. असे ट्विट अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केले होते.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -