लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्या, दरेकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

लोकल प्रवास बंद असल्यामुळे सर्वसामान्य नागरीकांना नोकरीला जाणे दुरापास्त झाले आहे.

darekar criticizes mva thackeray govt on st bus employee suicide and ST workers strike

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आणि केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांना पत्र लिहून मुंबईतील लोकल प्रवाशांसाठी सुरु करावी अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. ज्या नागरिकांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत अशा नागरिकांना लोकल प्रवासाची परवानगी द्यावी अशी विनंती दरेकरांनी केली आहे. विरार, कल्याण, बदलापूरवरुन येणाऱ्या प्रवाशांना अधिकचे पैसे आणि प्रवासासाठी ३ ते ४ तास घालवायला लागत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मुंबईतील लोकल सर्वसामान्यांसाठी बंद ठेवण्यात आली आहे.

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून लोकल प्रवासास परवानगी देण्याची मागणी केली आहे. दरेकर यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे की, कोरोनाचा संसर्ग गतवर्षी मार्च २०२० पासून सुरु झाला. कोरोनाचा प्रादुर्भाव सर्व ठिकाणी वाढू नये व ही ‘कोरोनाची साथ नियंत्रणात यावी याकरीता संपुर्ण भारतभर लॉकडाऊन लावण्यात आला. परंतु जसा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला तसा विविध राज्यांमधील शहरांमधील निर्बंध कमी करण्यात आले. दिल्ली, मुंबई, चैन्नई, कोलकत्ता ह्या चार महानगरांना कोरोनाचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात झाला होता. दिल्ली, मुंबई, चैन्नई, कोलकत्ता स्थानिक नागरीकांच्या प्रवासासाठी रेल्वे, मेट्रो, ट्राम इत्यादी कार्यरत आहेत. वाहतुकीची ही साधणे या शहरांसाठी व तेथील नागरीकांसाठी खुप महत्वाची आहेत.

मुंबईची लोकल ही तर मुंबईची जीवनवाहिनीच आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून सर्वसामान्य नागरीकांसाठी लोकल प्रवास बंद आहे. लोकल प्रवास बंद असल्यामुळे सर्वसामान्य नागरीकांना नोकरीला जाणे दुरापास्त झाले आहे. परिणामी जीवन कसे जगायचे असा मोठा प्रश्‍न त्यांच्यासमोर निर्माण झालेला आहे. सद्यस्थितीत लसीकरण मोठया प्रमाणावर सुरु आहे. जगामध्ये सर्वाधीक संख्यने अधिक लसीकरण भारतात झाले आहे. ज्याचे दोन्ही डोस पुर्ण झाले आहेत त्यांना आजरोजी लोकलमध्ये प्रवासाची मुभा नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे अर्थसंकल्प कोलमोडलेला आहे त्यामुळे लोकल प्रवासास मान्यता देऊन नागरिकांना दिलासा द्यावा अशी विनंती दरेकरांनी केली आहे.

प्रवीण दरेकर यांची मागणी

१) कर्जत, कसारा पासून ते मुंबईपर्यंत, डहाणू पासून ते मुंबईपर्यंत, पनवेल पासून ते मुंबईपर्यंत ज्या नागरीकांचे संपुर्ण लसीकरण झाले आहेत (ज्यांचे लसीचे दौन्ही डोस झाले आहेत) अशा सर्वसामान्य नागरीकांना प्रवासाची मुभा देण्यात यावी.

२) सरकारी कर्मचाऱ्यांना लोकल मधून वाहतूक करण्याची अनुमती आहे त्याचप्रमाणे जे खासगी कर्मचारी आहेत ज्यांचे लसीकरणाचे दोन्ही डोस झाले आहे त्यांनाही लोकल मधून वाहतुकीची अनुमती मिळावी