घरताज्या घडामोडीकल्पिता पिंपळेंच्या हल्लेखोरावर मोक्काअंतर्गत कारवाई करा, दरेकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

कल्पिता पिंपळेंच्या हल्लेखोरावर मोक्काअंतर्गत कारवाई करा, दरेकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Subscribe

भ्रष्ट अधिकाऱ्यांचा सहभाग उजेडात आणण्यासाठी या प्रकरणी मोक्‍काअंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे.

ठाण्यातील पालिकेच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळेंवर एका फेरीवाल्याने केलेल्या हल्यात जबर जखमी झाल्या आहेत. पिंपळे यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीवर मोक्काअंतर्गत कारवाई करावी अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून सविस्तर माहिती देत पिंपळेंच्या हल्ला प्रकरणात मोक्का आंतर्गत कारवाई करण्याची विनंती केली आहेच. अशा संघटित कारवायांमध्ये गुंतलेल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचा सहभाग उजेडात आणण्यासाठी या प्रकरणी मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी दरेकरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

राज्यात अवैध व्यवसायांना संरक्षण देणारे गुन्हेगार व भ्रष्ट अधिकारी अशा प्रकारे संघटित गुन्हेगारीची साखळी निर्माण झाली आहे. त्याचाच भाग म्हणजे ठाणे येथे घडलेला प्रकार होय. त्यामुळे केवळ हल्ला करणाऱ्या फेरीवाल्याविरोधात कारवाई न करता अशा संघटित कारवायांमध्ये गुंतलेल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचा सहभाग उजेडात आणण्यासाठी या प्रकरणी मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी आज विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

- Advertisement -

ठाण्यातील कासारवडवली भागात अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाई करताना झालेल्या प्राणघातक हल्ल्यात ठाणे पालिकेच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळेच्या हाताची दोन बोटे तुटली. त्यांच्यावर ठाणे येथील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आपण स्वतः जखमी पिंपळे यांची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली असून घटनेची माहिती घेतली असल्याचे दरेकर यांनी पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.

प्रविण दरेकरांनी पत्रात काय म्हटलंय?

ठाण्यातील कासारवडवली भागात अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाई करताना झालेल्या प्राणघातक हल्ल्यात ठाणे पालिकेच्या सहायक आयुक्‍त कल्पिता पिंपळे जबर जखमी झाल्या असून त्यांच्यावर ठाणे येथील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मी स्वतः जखमी पिंपळे यांची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली असून घटनेची माहिती घेतली आहे. राज्यात फेरीवाला धोरण अंतिम झालेले नाही. त्याचा गैरफायदा घेऊन काही समाजविघातक शक्‍ती अनधिकृतपणे पदपथ अडवून बेकायदेशीर व्यवसायाला प्रोत्साहन व संरक्षण देण्याचा प्रयत्न राज्यात करीत आहेत. त्याचप्रमाणे भ्रष्ट अधिकाऱ्यांना देखील यात सहभाग असल्याचे दरेकरांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

- Advertisement -

भ्रष्ट अधिकारी अशा व्यवसायांना संरक्षण देत असून प्रामाणिक कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्याने या भ्रष्ट व्यवस्थेविरोधात कारवाई करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर जीवघेणे हल्ले करेपर्यंत या भ्रष्ट साखळीची हिम्मत वाढली आहे. अवैध व्यवसायांना संरक्षण देणारे गुन्हेगार व भ्रष्ट अधिकारी अशा प्रकारे हा संघटित गुन्हेगारीचा एक भाग आहे. ठाणे येथे घडलेला प्रकार याच वर्गातील आहे. त्यामुळे केवळ हल्ला करणाऱ्या फेरोवाल्याविरोधात कारवाई न करता अशा संघटित कारवायांमध्ये गुंतलेल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचा सहभाग उजेडात आणण्यासाठी या प्रकरणी मोक्‍काअंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे. वरील परिस्थितीचा विचार करून ठाणे येथील प्रकरणात मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करावी अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली आहे.


हेही वाचा : आम्ही तुमच्या सोबत, काळजी करु नका; मुख्यमंत्र्यांनी केली कल्पिता पिंपळेंची विचारपूस


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -