घरताज्या घडामोडीवाझेंची उचलबांगडी हे सरकारचं मलमपट्टी लावण्याचं काम - प्रविण दरेकर

वाझेंची उचलबांगडी हे सरकारचं मलमपट्टी लावण्याचं काम – प्रविण दरेकर

Subscribe

अंबानींच्या घराबाहेर आढळलेल्या स्कॉर्पिओ मालक मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची गुन्हे शाखेतून (CIU) उचलबांगडी करण्यात आली आहे. पण हे राज्य सरकारने मलमपट्टी लावण्याचं काम केलं असल्याचं वक्तव्य विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलं आहे. ते म्हणाले की, मलमपट्टी लावण्याचं काम आम्हाला नको. सचिन वाझेंना अटक करण्यात यावी, यासाठी भाजपने विधानसभा आणि विधानपरिषदेत आक्रमक भूमिका घेतली आहे. पण अजूनही सरकार सचिन वाझेंना का पाठिशी घालत आहे?, असा सवाल त्यांनी केला.

प्रवीण दरेकर म्हणाले की, ‘सचिन वाझेंविरोधात अनेक पुरावे आहेत. तसेच हिरेन यांच्या पत्नीने देखील जबाबामध्ये सचिन वाझे यांनी आपल्या पतीचा खून केला आहे असं म्हटलं आहे. तरीही सरकार वाझेंना पाठीशी का घातलंय? आम्ही आज विधानपरिषदेत कायद्या सुविधाच्या चर्चेतदरम्यान आकडेवारी नको, सचिन वाझेंवर बोला, अशी मागणी केली. पण गृहमंत्री काही बोलायला तयार नव्हते. त्यामुळे आम्ही एकदा, दोनदा, तीनदा आम्ही सभागृह बंद पाडलं. त्यामुळे आता सचिन वाझेंचं जोपर्यंत निलंबन किंवा अटक होत नाही, तोपर्यंत भाजपची आक्रमक भूमिका असणार आहे.’

- Advertisement -

‘एक सचिन वाझेमुळे पोलिसांची प्रतिमा मलिन होत आहे. त्यामुळे वाझेंची बदली करून प्रश्न सुटणार नाही. त्यांना निलंबित किंवा अटक करावी अशी मागणी विरोधी पक्षाची आहे. महाराष्ट्र पोलीस दलासाठी एका सचिन वाझेला वाचवणं हे शोभादायक नाही,’ असं दरेकर म्हणाले.


हेही वाचा – हिरेन मृत्यूप्रकरणात घाईघाईने NIAने घुसणं, यातच काहीतरी काळंबेरं – राऊत

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -