Thursday, August 5, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी सरकारच्या बेफिकीरीमुळे कोकणात पूरस्थिती - प्रवीण दरेकर

सरकारच्या बेफिकीरीमुळे कोकणात पूरस्थिती – प्रवीण दरेकर

गेल्या १० दिवसांपासून मुंबईची तुंबई झाली. दरडी कोसळून अनेक लोक मृत्युमुखी पडले. तसेच कोकणातही हवामान खात्याने रेड अलर्ट दिला असूनही राज्य सरकारने कोकणात कोणतेही पूर्वनियोजन केले नाही.

Related Story

- Advertisement -

राज्य सरकारचा बेफिकिरपणा आणि ढिसाळ नियोजनामुळे कोकणामध्ये पूरस्थिती निर्माण होऊन याचा फटका कोकणवासियांना बसल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी गुरुवारी केला. (Pravin darekar Slams Govt over kokan flood)  कोकणाला अतिवृष्टीचा धोका असल्यामुळे कोकणाच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने राज्य सरकारने तातडीने उपाययोजना करण्याची विनंती आपण राज्य सरकारकडे केली होती. परंतु सरकारने याविषयी तातडीने कुठलेही गंभीर पाऊल उचलले नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

अतिवृष्टीमुळे कोकणात निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत बोलताना दरेकर म्हणाले, गेल्या १० दिवसांपासून मुंबईची तुंबई झाली. दरडी कोसळून अनेक लोक मृत्युमुखी पडले. तसेच कोकणातही हवामान खात्याने रेड अलर्ट दिला असूनही राज्य सरकारने कोकणात कोणतेही पूर्वनियोजन केले नाही. प्रशासकीय यंत्रणा तोकडी पडली असून कोकणवासीयांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

- Advertisement -

कोकणातील नद्यांना पूर आला असून, कोकणवासीयांना तातडीच्या मदतीची आवश्यकता आहे. कोकणातील अनेक गावे पाण्याखाली गेली असून लोकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. त्यामुळे राज्य सरकारला कपड्यांपासून जेवणापर्यंत व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे. या संकटच्या परिस्थितीत राज्य सरकारने युद्धपातळीवर नियोजन करण्याची गरज आहे. परंतु एनडीआरएफची टीम अजूनही कोकणात पोहोचल्या नव्हत्या. त्यामुळे यामधून राज्य सरकारची बेफिकिरी, निष्काळजीपणा दिसून येतो, अशी टीका दरेकर यांनी केली.

कोकणात एनडीआरएफची राखीव टीम ठेवण्यात यावी जेणेकरून काही नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास घाई होणार नाही. एक टीम महाड, चिपळूण, रत्नागिरी येथे ठेवण्यात यावी. मुख्य शहारामध्ये जर तासाभराच्या अंतरावर एनडीआरएफची टीम असेल तर उपाययोजना तातडीने करता येईल, अशी सूचना दरेकर यांनी सरकारला केली.

- Advertisement -

स्थलांतरित नागरिकांसाठी वेळीच राहण्यासाठी जागेची व्यवस्था केली असती तर आता आलेले अतिवृष्टीचे संकट तोंडाशी आल्यावर नागरिकांसाठी जागा शोधण्याची वेळ सरकार आणि पर्यायाने प्रशासनावर आली नसती. या कृतीमधून तहान लागली की विहीर खोदा, अशा प्रकारचा निष्काळजीपणा दिसून येत असल्याचा टोलाही दरेकर यांनी सरकारला लगावला.


हेही वाचा – आभाळ फाटलं, चिपळूणमध्ये २००५ ची पुनरावृत्ती?

- Advertisement -