घरताज्या घडामोडीमाझ्यावर गुन्हा दाखल करून मला अटकवण्याचा सरकारचा प्रयत्न होता : प्रवीण दरेकर

माझ्यावर गुन्हा दाखल करून मला अटकवण्याचा सरकारचा प्रयत्न होता : प्रवीण दरेकर

Subscribe

मुंबै बँकेतील बोगस मजूर प्रकरणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई पोलिसांनी प्रवीण दरेकर यांची दोन वेळा चौकशी केली होती. दरेकरांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले असून सरकार सूडबुद्धीने कारवाई करत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

मुंबै बँकेतील बोगस मजूर प्रकरणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई पोलिसांनी प्रवीण दरेकर यांची दोन वेळा चौकशी केली होती. दरेकरांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले असून सरकार सूडबुद्धीने कारवाई करत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. मात्र आज प्रवीण दरेकरांना हायकोर्टाचा दिलासा मिळाल्यानंतर त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. तसंच, ‘सरकारच्या दबावाखाली गुन्हा दाखल केला होता’, असं म्हटलं.

“मुंबै बँकेतील बोगस मजूर प्रकरण ओढून-ताणून सरकारच्या दबावाखाली गुन्हा दाखल केला होता. तथापी कायद्याला माणणारे आम्ही भाजपाचे कार्यकर्ते लोकप्रतिनिधी असल्यानं या सर्व चौकशीला सामोरं जावून न्यायालयामध्ये दाद मागावी यासाठी न्यायालयात गेलो होतो. तसंच, न्यायालयानंही वारंवार तात्पुरती रिलीफ दिली होती आणि अखेर आज न्यायालयाचा दिलासा मिळाला. माझ्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यामागे मुख्यमंत्री कार्यालयाचा दबाव होता. तसंच, सरकारच्याच दबावाखाली याप्रकरणी षडयंत्र रचण्यात आलं होतं आणि गुन्हा दाखल करून मला अटकवण्याचा डाव या सरकारचा होता” असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं.

- Advertisement -

“मी विरोधी पक्षनेता म्हणून या सरकारच्या भ्रष्टाचारांचा आणि घोटाळ्यांचा पर्दाफाश करत होतो. त्यामुळं माझ्यावर सुड उगवण्यासाठी अशी कारवाई सरकारकडून केली जात होती. अशाच प्रकारचा डाव सरकारचा होता. सत्ताधारी सरकारमधील मंत्री तुरूंगामध्ये आहेत. तसंच, भाजपाचे नेते आरोप करत आहेत. त्यामुळं आपणी त्यांना काउंटर केलं पाहिजे, अशा प्रकारची स्ट्रॅटेजी महाविकास आघाडीची ठरली. ज्यामध्ये संजय राऊतांनी पुढाकार घेतला. मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून गृहखात्यावर दबाव आणला, आणि मग त्यानी कारवाईचा ससेमीरा लावला. परंतु, आम्हाला न्यायालयानं दिलासा दिला”, असंही प्रवीण दरेकरांनी म्हटलं.

आयएनएस विक्रांत युद्धनौका प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर किरीट सोमय्या चौकशीककरीता समोर येत नसून, त्याचा शोध राज्य सरकार घेत आहे, तसंच केंद्राकडे त्यांच्याबद्दल विचारणा केला जाणार असा प्रश्न विचारला असता, त्यांनी यावेळी “किरीट सोमय्या हा पळणारा नेता नसून, इतरांना पळवणारा नेता आहे. त्याच्यामुळं न्यायालयीन प्रक्रीया असते. तसंच, कायदेशीर कारवाई करण्यामध्ये ते मग्न असतील. त्यामुळं न्यायालीयन जो काय न्याय मागायचा आहे त्यानंतर ते आवशक्यता वाटल्यास ते पोलिसांच्या चौकशीला समोर जातील.”

- Advertisement -

प्रवीण दरेकर यांनी यावेळी बोलताना संजय राऊतांवरही टीका केली. “भारतीय जनता पार्टीचा नेता जेलमध्ये जात नाही, तोपर्यंत संजय राऊतांना झोप लागत नाही. त्यामुळं रोज सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी भाजपाच्या नेत्यांवर टीका करत गुन्हे दाखल करत जेलमध्ये टाकण हा सध्या संजय राऊतांचा प्राधान्याचा विषय आहे”, असं प्रवीण दरेकरांनी म्हटलं.


हेही वाचा – Mumbai Bank : प्रवीण दरेकरांना अटकपूर्व जामीन मंजूर, हायकोर्टाचा मोठा दिलासा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -