Friday, September 17, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी बैठकीत मुजरा अन् मीडियात गोंधळ अशी नाना पटोलेंची अवस्था, दरेकरांची टीका

बैठकीत मुजरा अन् मीडियात गोंधळ अशी नाना पटोलेंची अवस्था, दरेकरांची टीका

बैठकीत मुजरा आणि मीडियात गोंधळ असं एक गोंधळी नाना पटोले म्हणून नवं कॅरेक्टर महाराष्ट्राला पाहायला मिळालं - दरेकर

Related Story

- Advertisement -

बैठकीत मुजरा अन् मीडियात गोंधळ अशी अवस्था काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची झाली असल्याची टीका भाजप नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. सर्व पक्षीय ओबीसी बैठकीमध्ये ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय निवडणुका होऊ नये यावर एकमत झाले आहे. मात्र ओबीसींचे राजकीय आरक्षण भाजपमुळे गेले असल्याची टीका नाना पटोले यांनी केली होती. नाना पटोलेंच्या या टीकेला आता भाजकपकडून सडेतोड प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची स्थिती म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असे वक्तव्य नाना पटोले यांनी केलं होतं यावर दरेकरांनी नाना पटोलेवर घणाघात केला आहे.

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी नाना पटोलेंवर टीका करताना म्हटलं आहे की, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा नवा चेहरा महाराष्ट्राला पाहायला मिळाला आहे. आपल्याकडे एक चित्रपट आहे गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा तर नानांचा बैठकीत मुजरा आणि मीडियात गोंधळ असं एक गोंधळी नाना पटोले म्हणून नवं कॅरेक्टर महाराष्ट्राला पाहायला मिळालं असल्याची टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. कारण भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मागच्या बैठकीत आणि आजच्या बैठकीत ओबीसी आरक्षणाचा तिढा कसा सुटावा यासंदर्भात संपुर्ण अभ्यासपुर्ण मार्गदर्शन केलं ज्या आधारे आता आपण अंतिम निर्णयापर्यंत पोहचू शकतो त्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही समर्थन केल आहे.

- Advertisement -

अस असताना त्या सभागृहातील बैठकीत देवेंद्र फडणवीस यांचे समर्थन करत असताना नाना पटोलेंच्या रक्तातील राजकीय अभिनिवेश मीडियासमोर आल्यानंतर जाऊ शकत नव्हता आणि म्हणून या ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात जी काही दिरंगाई झाली ती भाजपमुळे झाली असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. खरं तर नानांना राजकीय कावीळ झाली आहे यामुळे राजकीय वक्तव्य केल्याशिवाय त्यांना स्वस्थ बसता येत नाही आहे. अशी खोचक टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे.


- Advertisement -

हेही वाचा : कोणत्याही तात्पुरत्या व्यवस्थेला काँग्रेस पक्षाचा विरोध, OBC आरक्षणावर नाना पटोलेंचे वक्तव्य


- Advertisement -