घरताज्या घडामोडी'शिवाजी महाराजांच्या नावाने मत मागणारे सरकार आराध्य दैवतालाच विसरले'

‘शिवाजी महाराजांच्या नावाने मत मागणारे सरकार आराध्य दैवतालाच विसरले’

Subscribe

‘नवीन सरकार आल्यानंतरचे हे पहिलेच अधिवेशन आहे. या अधिवेशनात महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील भव्य स्मारकाबाबत कोणताही उल्लेख नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मत मागणारे सरकार आज याच आराध्य दैवताला विसरले’, अशा शब्दांत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर टीका केली. त्याचबरोबर राज्यातील जनता या सरकारकडे अनेक अपेक्षा घेवून तुमच्याकडे पाहत आहे. मात्र राज्यपालांचे अभिभाषण लक्षात घेतले तर ते सर्वसामान्यांचा विचार करणारे नसल्याची टीका देखील दरेकर यांनी परिषदेत केली.


हेही वाचा – ‘मुख्यमंत्र्याचे आजचे भाषण काळ्या दिवसासारखं’

- Advertisement -

‘शेतकऱ्यांसाठी २५ हजार हेक्टरी मदत द्यावी’

राज्यात अवकाळी पावसामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांसाठी २५ हजार हेक्टरी मदत देण्याची मागणी प्रवीण दरेकर यांनी पुन्हा एकदा लावून धरली आहे. दरम्यान, ही मागणी वेळीच जाहीर न केल्यास गरज पडल्यास रस्त्यावर उतरु, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. १४ व्या विधानसभेच्या संयुक्त आमदारांच्या बैठकीत नुकतेच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अभिभाषण केले होते. या अभिभाषणावर विधान परिषदेत चर्चा करताना त्यांनी टीका केली. यावेळी त्यांनी सरकारच्या अनेक योजनांवर कडाडून टीका केली.


हेही वाचा – ‘आमचं रिक्षाचं सरकार, बुलेट ट्रेनचे नाही’

- Advertisement -

 

‘दहा रुपयांच्या थाळी योजना अधिक सक्षमपणे असणे गरजेचे’

राज्य सरकारच्या वनरुपी क्लिनिकच्या घोषणेवर हल्ला चढविताना ते म्हणाले, ‘ही योजना अत्यंत स्तुत्य आहे. पण आज राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राची अवस्था जर पाहिली तर या योजनेचा पुरता बोजवरा उडाला आहे. आज या केंद्रातील एमबीबीबीएस दर्जाचे वैद्यकिय अधिकारी सुद्धा नाहीत. त्यामुळे सर्वप्रथम या केंद्रात प्रथम मूलभूत सुविधा दिल्या पाहिजे. या प्राथमिक केंद्रावर ज्या सुविधा सध्याच्या घडीला आहेत. त्या अगोदर सुदृढ करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.’ तर राज्य सरकारने जाहीर केलेल्या दहा रुपयांच्या थाळी संदर्भातही त्यांनी भाष्य केले. या योजनेसाठी जे काही सहकार्य लागेल, ते देण्याची ग्वाही त्यांनी दिली. ‘ही योजना सुरु करताना त्यासाठी सरकारवर कर्जाचा बोजा येणार आहे. त्यामुळे ही योजना अधिक सक्षमपणे असणे गरजेचे आहे. अन्यथा या योजनेची गत झुणका भाकर केंद्रासारखी होवू शकते’, असे ते यावेळी म्हणाले.

‘कोकणाच्या पर्यटनासाठी १००० कोटी द्या’

‘राज्यपालांच्या अभिभाषणात गुंतवणूकीसाठी प्रोत्साहन दिले जात असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र यावरही प्रविण दरेकर यांनी टीका केली. या सरकारने अनेक विकास प्रकल्पांना स्थगिती दिली आहे. त्यामुळे राज्यातील गुंतवणूक थंडावली आहे. सूडाचे राजकारण करु नये, कोणतेही प्रकल्प थांबवू नये. आज शिवसेना मुंबई, ठाणे आणि कोकणात बलाढ्य मानले जाते. त्यामुळे कोकणात जर पर्यटन विकासाला वाव द्यायची असेल तर राज्य सरकारने कोकणासाठी १००० कोटींचा निधी द्यावा’, अशी मागणी प्रविण दरेकर यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -