घरताज्या घडामोडीलतादीदींच्या निधनानिमित्त राजकारण करू नका म्हणणारेच राजकारण करताहेत - प्रविण दरेकर

लतादीदींच्या निधनानिमित्त राजकारण करू नका म्हणणारेच राजकारण करताहेत – प्रविण दरेकर

Subscribe

प्रत्येकाला नागरिक म्हणून आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. प्रत्येकाला सोशल मिडियावर बोलण्याचे व्यक्तिस्वातंत्र्य आहे. परंतु उर्मिला मातोंडकर अभिनेत्री म्हणून त्या बोलतायत, नागरिक म्हणून बोलतायत की शिवसेनेच्या नेत्या म्हणून बोलतायत, हे पाहावे लागेल. कारण त्यांच्या भूमिका नेहमी बदलणाऱ्या आहेत. लता मंगेशकर यांच्या निधनानिमित्त राजकारण करू नका, म्हणणाऱ्यांकडूनच राजकारण केले जातेय, हे यावरून सिद्ध होतेय, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी व्यक्त केली.

लता मंगेशकर यांच्या अंत्यदर्शनाच्यावेळी अभिनेता शाहरुख खान थुंकला या विषयावरुन सोशल मीडियावर त्याला ट्रोल केले जातेय. त्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्रोलर्सना खडसावले आहे. तसेच अभिनेत्री आणि शिवसेनेच्या नेत्या उर्मिला मातोंडकर यांनीही ट्रोल करणाऱ्यांवर टीका केली आहे. तसेच ट्रोलर्स हे भाजपचे कार्यकर्ते आहेत, असाही आरोप शिवसेनेकडून केला जातोय.

- Advertisement -

त्यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी दरेकर बोलताना म्हणाले की, सोशल मिडियामद्धे जे कोणी हे केले त्याचा शोध होईल, कदाचित त्याविरुध्द योग्य ती कारवाईही होईल. पण एखादी गोष्ट झाल्यानंतर लगेच भाजपवर दोषारोप करणे, हा राजकारणाचा भाग नाही का? आणि जर एखाद्याने हिंदुत्ववादी भूमिकेतून त्याला वाटले आणि त्याने तशी भूमिका सोशल मीडियातून मांडली असेल तर त्याचा एवढा गदारोळ करण्याची काय आवश्यकता आहे? म्हणजे आपण करतो ते चांगले आणि इतर करतात ते राजकारण अशी दुटप्पी भूमिका बरोबर नाही, असेही दरेकर यांनी सांगितले.


हेही वाचा : मी दोन ते तीन महिने उठू नये अशा पद्धतीने मारण्याचा कट, किरीट सोमय्या यांचा गंभीर आरोप

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -