घरअर्थसंकल्प २०२२राज्यातल्या अनेक नेत्यांची मजूर म्हणून नोंद आणि कारवाई फक्त दरेकरांवरच?, प्रवीण दरेकरांचा...

राज्यातल्या अनेक नेत्यांची मजूर म्हणून नोंद आणि कारवाई फक्त दरेकरांवरच?, प्रवीण दरेकरांचा सवाल

Subscribe

मुंबै बँकेच्या प्रकरणावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी विधानपरिषदेत स्पष्टीकरण दिलंय. राज्यातील मजूर संस्थेवर असलेल्या महाविकास आघाडीमधील अध्यक्षांची यादी दरेकरांनी वाचून दाखवली. तसेच या सर्व प्रकरणाच्या चौकशीची मागणी करणार असल्याचं दरेकरांनी सांगितलं. मी वीस-पंचवीस वर्षे या सहकार चळवळीत काम करतोय. मजूर चळवळीच्या माध्यमातून बेरोजगार तरूणांसाठीही काम करण्याचा प्रयत्न केला. परंतु राज्यातल्या अनेक नेत्यांची मजूर म्हणून नोंद असून कारवाई फक्त दरेकरांवरच? असा सवाल प्रवीण दरेकरांनी विचारला आहे.

शिवशाहीचं सरकार होतं. त्यावेळी सहकारमंत्री जयप्रकाश मुंदडा होते. त्यामुळे त्यांना विनंती करून मुंबईतल्या अनेक बेरोजगार तरूणांना सुद्धा या मजूर संस्थांच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध व्हावा. या भूमिकेतून त्याठिकाणी काम केलं. राज्यातल्या अनेक नेत्यांची मजूर म्हणून नोंद आहे. मात्र, कारवाई फक्त दरेकरांवरच होईल, असं सांगून टाका. सहकार चळवळीवर दरोडे यांनी टाकायचे. मात्र, २२,३०० रूपये भत्ता घेतल्याचा आरोप माझ्यावर करायचा, असा आरोप दरेकरांनी केला आहे.

- Advertisement -

साखर कारखानदारी हे महाराष्ट्राचं वैभव होतं. देशातला सुनियोजित घोटाळा कोणता असेल तर तो महाराष्ट्र शिखर बँकेचा घोटाळा आहे. सहकार मंत्री सूड भावनेने वापर करत आहेत. सहकार मंत्र्यांनी आणि सीएमओ मधून कॉल करून कारवाई करायला लावली. विरोधी पक्षाच्या नेत्यांना चिरडून टाकायचा प्रयत्न केला जात आहे. १५ हजार मजूर संस्था असून तुम्ही किती लोकांवर कारवाई करणार, असा सवालही दरेकरांनी विचारला आहे.


हेही वाचा : ST Workers Strike : त्रिसदस्यीय समितीच्या तरतुदींसाठी आर्थिक बाबींवर शासन मंजुरी गरजेची – परिवहन मंत्री अनिल परब

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -