घरअर्थसंकल्प २०२२Maharashtra Budget Session 2022 : जोपर्यंत मलिक राजीनामा देणार नाहीत, तोपर्यंत आमची...

Maharashtra Budget Session 2022 : जोपर्यंत मलिक राजीनामा देणार नाहीत, तोपर्यंत आमची लढाई सुरूच राहणार – प्रवीण दरेकर

Subscribe

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज(शुक्रवार) दुसरा दिवस आहे. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. त्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपकडून स्वाक्षरी मोहीम सुरू आहे. तसेच मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजप चांगलेच आक्रमक झाले आहेत. दाऊद टोळीशी संबंध ठेवणाऱ्यांना आणि संरक्षण देणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा निषेध असो, अशा प्रकारचे फलक घेऊन भाजप पायऱ्यांवर आंदोलन करत आहेत. दरम्यान, जोपर्यंत मलिक राजीनामा देणार नाहीत, तोपर्यंत आमची लढाई सुरूच राहणार, असं विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.

आमची लढाई सुरूच राहणार

प्रवीण दरेकर यांनी विधिमंडळाच्या बाहेर पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, ओबीसींना आरक्षण मिळालंच पाहीजे अशी भारतीय जनता पार्टीची भूमिका पहिल्यादिवसापासून आहे आणि आजही ती असणार आहे. त्यामुळे सभागृहात आक्रमकपणे दिवसभरात जे काही करावे लागेल ते भाजपा दोन्ही सभागृहात केल्याशिवाय राहणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक जोपर्यंत राजीनामा देत नाहीत. तोपर्यंत सभागृहात, विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आणि रस्त्यांवर आमची लढाई सुरूच राहणार आहे.

- Advertisement -

आबोसींच्या बाबतीत भारतीय जनता पार्टीची क्लिअर कट भूमिका आहे. ओबीसींच्या मागे भारतीय जनता पार्टी मराठा आरक्षणाप्रमाणेच ठामपणे आहे, असं प्रविण दरेकर म्हणाले.

देशद्रोही नवाब मलिकांनी राजीनामा द्यायला पाहीजे

नवाब मलिक यांचे संबंध देशद्रोह्यांसोबत आहेत. अशा देशद्रोही नवाब मलिकांनी राजीनामा द्यायला पाहीजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा, अशा प्रकारची आमची मागणी आहे. जोपर्यंत नवाब मलिक राजीनामा देत नाहीत आणि किंबहुना ठाकरे सरकार राजीनामा घेत नाहीत. तोपर्यंत सरकारला आम्ही काम करून देणार नाही, असं दरेकर म्हणाले.

- Advertisement -

भाजप केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करतंय असा प्रश्न पत्रकाराने दरेकरांना विचारला असता दरेकर म्हणाले की, तुमचे कृत्य तशी असल्यामुळे चौकशीत आणि तपासणीत काहीतरी तथ्य आढळतं. त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणा येतात. आता हे तुमच्या अंगाशी आल्यावर तपास यंत्रणांना का दोष देत आहात. तसेच महाराष्ट्राला बदनाम करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असं म्हणत दरेकरांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.


हेही वाचा : Maharashtra Budget Session 2022 : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी भाजप ओबीसी आरक्षणावरुन आक्रमक


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -