नवाब मलिक यांनी केंद्राला कमी टार्गेट केल्यास अडचणी कमी होतील, दरेकरांचा इशारा

संकटाच्या काळात तरी अशा प्रकारचा संकुचित विचार करणं योग्य वाटत नाही

pravin darekar warn nawab malik lesser target to centrel government will face less problem
नवाब मलिक यांनी केंद्राला कमी टार्गेट केल्यास अडचणी कमी होतील, दरेकरांचा इशारा

राज्यात कोरोनाची प्रकरणे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील आरोग्य व्यवस्था खिळखिळीत झाली आहे. केवळ केंद्र सरकारला टार्गेट करून आणि दुसऱ्या राज्यांतील स्वतःच्या सोयीची असलेली उदाहरणे देऊन राजकारण करण्याचा प्रयत्न मंत्री नवाब मलिक करतात. त्यामुळे ते जरा कमी बोलले तर अडचणी कमी होतील असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे. ऑक्सीजन पुरवठा आणि रेमडेसिवीरच्या पुरवठ्यावरुन राज्य सरकार केंद्राकडे वारंवार बोट दाखवून टीका करत आहेत. त्यामुळे राज्यातील नेत्यांना केंद्राकडे कमी बोट दाखवले तर अडचणी कमी होतील असा इशाराच दिला आहे.

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ट्विट करत म्हटले आहे की, राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक जरा कमी बोलले तर अडचणी कमी होतील. आपण बघाल की त्यांच्या वक्तव्यामधून राज्याच्या असणाऱ्या आरोग्य व्यवस्थेसंदर्भात उपाययोजना सुचवण्याबाबत कधी ऐकले नाही. राज्यात असणाऱ्या व्यवस्था सुधारण्यासाठी त्या गतीमान करण्यासाठी काय करतोय हे कधी त्यांच्या पत्रकारपरिषदेतुन ऐकल्याचेही मला आठवत नाही. केवळ केंद्राला टार्गेट करत आपल्या सोयीची अशी दुसऱ्या राज्याची उदाहरण देत आपले केवळ या संकटाच्या काळात राजकारण करत असल्याचे नवाब मलिक यांच्या पत्रकार परिषदेतून दिसते आहे.

इतर राज्याचे सांगत असताना त्या राज्यांनी कोरोना काळात ज्या उत्तम उपाययोजना केल्या त्या आपल्या राज्यात अंमल करण्यासाठी काय केले याचे उत्तर ते देऊ शकणार नाहीत. त्यामुळे मला आता वाटत की केंद्र आणि राज्य अशा प्रकारचे वाद बंद करण्याची आवश्यकता आहे. परदेशांना मदत केल्यामुळे मोदींवर राज्य सरकार टीका करत आहे. परंतु आज फ्रान्स, कतारमधून आपल्याला ऑक्सीजन सिलेंडर आणि वैद्यकीय मदतभरुन नौका पाठवण्यात आली आहे. अनेक देश आपल्याला मदतीचा हात पुढे करत आहेत. जर पदेशाला आपल्याला मदत केली नसती तर परदेशातील देशांनी आपल्याला मदत केली नसती.

संकटाच्या काळात तरी अशा प्रकारचा संकुचित विचार करणं योग्य वाटत नाही चांगल्या आणि व्यापक दृष्टीने विचार करण्याची आवश्यकता आहे. तसेच सुसंवादातून आलेले संकट दूर करुन अशी नम्र अपेक्षा असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.