घरताज्या घडामोडीसरकारविरोधात आंदोलन केल्यामुळे मयुरेश कोटकरवर सूड उगवला का?, दरेकरांचा सवाल

सरकारविरोधात आंदोलन केल्यामुळे मयुरेश कोटकरवर सूड उगवला का?, दरेकरांचा सवाल

Subscribe

आपल्याबद्दल टीका केली म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल करण, अटक करण हे चूकीचे आहे.

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे मराठी अभिनेता मयुरेश कोटकरला अटक करण्यात आली आहे. नवी मुंबई विमानतळ नामकरणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. नवी मुंबई विमानतळाला दी.बा.पाटील यांचे नाव देण्याच्या मुद्द्यावरुन आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात अभिनेता मयुरेश कोटकर देखील सहभागी होता. आंदोलनात सहभागी असल्यामुळे अटक करण्यात आली का? असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. मयुरेश कोटकरला ठाण्यातील श्रीनगर पोलिसांनी अटक केली असून त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

लोकशाहीमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे ढोल पिटत असताना कोटकर नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करणं निंदनीय आहे. अभिनेता कोटकर नवी मुंबईतील विमानतळाला दि.बा.पाटील यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी करणाऱ्या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. फेसबूकच्या माध्यमातून अनेकजण बोलत असतात. परंतु आपल्याबद्दल टीका केली म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल करण, अटक करण हे चूकीचे आहे. ठाण्यातील कुरमुसे प्रकरण, दिलीप लांडेंनी कत्राटदारावर कचरा टाकण्याचं प्रकरणं या सगळ्याचा निषेध करतो. असे विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

कोटकरविरोधात पोलिसांत तक्रार

शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधीत मराठी अभिनेता मयुरेश कोटकरने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केली होती. यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांनी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी कारवाई करत मयुरेश कोटकरला न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -