घरताज्या घडामोडीThe Kashmir Files : द कश्मीर फाईल्स चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करा, प्रवीण...

The Kashmir Files : द कश्मीर फाईल्स चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करा, प्रवीण दटके यांची मागणी

Subscribe

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित द काश्मीर फाईल्स हा चित्रपट सध्या चर्चेचा विषय बनला आहे. काश्मिरी पंडितांवर झालेले अत्याचार या चित्रपटात दाखवण्यात आले आहेत. त्यामुळे प्रेक्षकांची चित्रपट बघण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यामुळे हरियाणासह अनेक राज्यांनी या चित्रपटावरील करमुक्त केला आहे. परंतु महाराष्ट्रातही हा चित्रपट करमुक्त करण्यात यावा, अशी मागणी विधानपरिषदेचे सदस्य प्रवीण दटके यांनी विधानपरिषदेत केली आहे.

प्रवीण दटके यांनी द कश्मीर फाईल्स हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करण्याची मागणी केली. तसेच चित्रपटात अडथळा निर्माण करणार्‍यांविरोधात संरक्षण द्यावे. तसेच यावेळी कारवाईची मागणी देखील दटके यांनी केली आहे.

- Advertisement -

काही ठिकाणी स्क्रिनिंग दरम्यान चित्रपटाचे काही संवाद आणि दृश्यं नि:शब्द केल्याच्या बातम्या आल्या होत्या. कला हा एक अभिव्यक्तीचा प्रकार आहे आणि अशा प्रकारे बेकायदेशीरपणे संवाद साधणे हे संविधानाने दिलेल्या स्वातंत्र्याच्या विरोधात आहे. सभागृहाने याची दखल घेऊन निर्देश जारी करावेत, असे दटके म्हणाले.

जम्मू-काश्मीरमध्ये मुस्लीम दहशतवादाला बळी पडलेल्या हिंदूंचे चित्रण करणारा द काश्मीर फाईल्स हा चित्रपट राज्यात करमुक्त करावा, अशी मागणी भाजपासह अनेक नेत्यांकडून करण्यात येत आहे. कारण जम्मू-काश्मीरमधील हिंदू समाजावर मुस्लीम दहशतवाद्यांनी अनन्वित अत्याचार केले याचे योग्य चित्रिकरण करण्यात आले आहे. त्यामुळे चित्रपटाच्या माध्यमातून देशातील अधिकाधिक जनतेला हा चित्रपट पाहता यावा, यासाठी हा चित्रपट करमुक्त करण्याची मागणी आता देशभरातून केली जात असल्याचं दिसत आहे.

- Advertisement -

काश्मीर फाईल्सचा सिनेमा आला आहे त्याला टॅक्स फ्री करा – दिलीप वळसे-पाटील

काश्मीर फाईल्सचा सिनेमा आला आहे त्याला टॅक्स फ्री करा, मी पाहिला नाही सिनेमा परंतु ज्यांनी पाहिला आहे. त्याच्यामध्ये स्वातंत्र्याच्या काळात जेव्हा स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी या देशातून त्या देशात असे येणे-जाणे झाले आहे. त्याच्यावर तो सिनेमा आहे. आज मला हे या सभागृहात लक्षात आणून द्यायचे आहे की, हा सिनेमा झाल्यानंतर लोकांना वेगळ्या हॉलमध्ये नेले जात आहे. आणि हिंदु जनजागृतीबाबत चर्चा केली जाते. हे सुरु केल्यामुळे काही लोकांनी झुंड सिनेमा दाखवण्यास सुरुवात केली आहे, असं विधानसभेचे सदस्य आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील विधानसभेत म्हणाले.


हेही वाचा : देवेंद्र फडणवीसांना राजकीय हेतूने नोटीस पाठवण्यात आली नव्हती – गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -