घरमहाराष्ट्रनाशिकबजरंगवाडीतील करोनाग्रस्त गर्भवती महिलेचा दीर यापूर्वीच होता होम क्वॉरंटाईन

बजरंगवाडीतील करोनाग्रस्त गर्भवती महिलेचा दीर यापूर्वीच होता होम क्वॉरंटाईन

Subscribe

अंत्यसंस्कारासाठी कोण-कोण आले याचा आता शोध सुरु; सिन्नरहून बाळंतपणासाठी बजरंगवाडीत आली होती महिला

शहरात करोनाचा पहिला बळी गेला आहे. बजरंगवाडी येथील २० वर्षीय गर्भवती महिलेचा तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला. तिचा करोना रिपोर्ट मंगळवारी (दि.५) पॉझिटिव्ह आला. त्यामुळे या महिलेच्या अंत्यसंस्कारासाठी कोण-कोण आले होते याचा शोध आता प्रशासनाने सुरु केला आहे. ही महिला नऊ महिन्याची गर्भवती होती. ‘आपलं महानगर’ला मिळालेल्या माहितीनुसार मृत महिलेचा दीर मुंबईहून काही दिवसांपूर्वी मुंबईहून महिलेच्या तब्बेतीची विचारपूस करण्यासाठी आला होता. त्याने तर करोना सायलेंट कॅरिअरची भूमिका बजावली नाही ना या दिशेने आता तपास सुरु झाला आहे.
मालेगाव येथे करोनामुळे १२ नागरिकांचे बळी गेले आहे. नाशिक शहरात करोनाचे रुग्ण आढळून येत असले तरीही बरे होणार्‍या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्याही मोठी आहे. शहरातील चार रुग्णांना आतापर्यंत हॉस्पिटलमधून डिस्चार्ज करण्यात आले आहे. मंगळवारी मात्र एका मृत महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली.

काय आहे बजरंगवाडी येथील महिलेची हिस्ट्री?

बजरंगवाडी येथे राहणारी २० वर्षीय गर्भवती महिलेचा तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. तिचा तपासणी अहवाल मंगळवारी प्राप्त झाला. ही महिला एक महिन्यापूर्वी नाशिक मध्ये सिन्नर येथून डिलिव्हरीसाठी माहेरी आलेली होती. २४ एप्रिलला ही महिला महापालिका रुग्णालयात तपासणीसाठी आलेली होती. त्यावेळेस तिला उच्च रक्तदाब असल्याचे निदान करण्यात आले. त्यानंतर तपासणी उपचाराकरिता डॉ. वसंतराव पवार रुग्णालय येथे संदर्भित करण्यात आलेले होते. परंतु ही महिला तेथे न जाता घरी गेली व कुठलेही उपचार घेतले नाहीत. त्याच वेळेस महिलेचा दीर जो मुंबई येथे कंटेन्मेंट झोन मध्ये होम क्वॉरंटाईन होता तो तिची तब्येतीची विचारपूस करण्यास आठ दिवसांपूर्वी आलेला होता. त्यानंतर दिनांक २ मे रोजी महिलेच्या पोटात वेदना सुरु झाल्या. तिला दमही लागत होता. त्यामुळे या महिलेला सायंकाळी ५.३०च्या सुमारास सिव्हिल हॉस्पिटल येथे भरती करण्यात आले. त्याच वेळेस तिची कोविड-१९ ची तपासणी नमुना घेण्यात आलेली होता. परंतु त्यानंतर तिची तब्येत आणखीन खालावली. सिव्हिलला दाखल केल्यानंतर अवघ्या तासाभरात या महिलेचा दुर्दवी मृत्यू झाला. मंगळवारी त्या महिलेचा अहवाल प्राप्त झालेला असून ती कोरोना बाधित असल्याचे सिद्ध झालेले आहे.

- Advertisement -

अंत्यसंस्कारास कोण होते, शोध सुरु

मृत महिलेचा बजरंग वाडी येथील घराचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र तयार करण्यात आला आहे. तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले तेव्हा तिचा करोना रिपोर्ट प्राप्त झालेला नव्हता. या अंत्यसंस्कारास कोण कोण उपस्थित होते याचा शोध घेऊन त्यांच्या वैद्यकीय तपासण्या आणि गरज पडल्यास करोना टेस्ट घेतली जाणार आहे.

आयुक्तांनी केली कंटेन्मेंट झोनची पाहणी

शहरातील जनरल वैद्य नगर परिसरातील वृंदावन कॉलनी व बजरंग वाडी परिसरात आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी वैद्यकीय पथकासह पाहणी केली. त्या ठिकाणी विविध प्रकारचे कामे करण्याचे आदेश आरोग्य विभाग, आरोग्य वैद्यकीय विभाग व विभागीय अधिकारी यांना दिले. परिसरातील रहिवाशी शासकीय नोकरी अथवा रुग्णसेवेत कार्यरत असेल अश्या रहिवाश्यांना बाहेर जाण्यासाठी शासनाच्या सूचनेप्रमाणे परवानगी मिळावी यासाठी नियोजन करण्याच्या सूचना विभागीय अधिकारी यांना देण्यात आल्या. या प्रतिबंधित क्षेत्रात आयुक्तांनी वैद्यकीय पथकाबरोबर जाऊन पाहणी केली. तसेच त्याठिकाणी असणारे पोलीस अधिकारी,महापालिकेचे आरोग्य, वैद्यकीय अधिकारी,आशा सेविका, विभागीय अधिकारी यांना विविध प्रकारच्या कामाच्या सूचना यावेळी दिल्या. तसेच या भागात कार्यरत असणारे आरोग्य वैद्यकीय विभागाचे कर्मचारी यांचे भोजन व्यवस्था,औषधाचा पुरवठा, पथकाद्वारे वैद्यकीय तपासणी करणे आदीच्या नियोजना बाबतची माहिती घेतली. जो परिसर प्रतिबंधित करण्यात आला आहे त्या परिसरातील रहिवाशांना निश्चित केलेल्या कालावधीत अत्यावश्यक सेवे व्यतिरिक्त कुणाला येथून बाहेर जाता येणार नाही अथवा बाहेरून याठिकाणी येता येणार नाही याबाबत दक्षता घेण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. या रहिवाशांना जीवनावश्यक वस्तूची निकड भासू नये यादृष्टीने भाजीपाला, दूध या सारख्या वस्तू त्याच ठिकाणी उपलब्ध होतील या दृष्टीने समन्वय करून व्यवस्था करण्याबाबत सूचित करण्यात आले. या प्रतिबंधित क्षेत्रात औषध फवारणी सुरू करण्यात आली असून त्याबाबत आढावा घेण्यात आला. घरोघरी जाऊन परिसरातील नागरिकांची तपासणी करण्यात यावी. प्रतिबंधित क्षेत्रात ज्या ठिकाणी उत्तम जागा उपलब्ध असेल त्या ठिकाणी बाह्यरुग्ण तपासणी सुरू करण्याची व्यवस्था करावी. शासनाच्या सूचनेप्रमाणे रुग्णावर उपचार करावेत अशा विविध सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या. बजरंग वाडी येथील परिसरात पाहणी करून त्याठिकाणी तातडीने औषध फवारणी सुरू केली. या पहाणीच्या वेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक ढमाले तसेच सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अजिता साळुंखे, डॉ.विनोद पावस्कर, डॉ. मंगेश दहेकर, विभागीय अधिकारी स्वप्नील मुधलवाडकर, स्वच्छता निरीक्षक शिरसाठ आदी उपस्थित होते.

बजरंगवाडीतील करोनाग्रस्त गर्भवती महिलेचा दीर यापूर्वीच होता होम क्वॉरंटाईन
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -