घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रदरोड्याची तयारी; पोलिसांची चाहूल लागताच कार, पिस्तूल, साहित्य टाकून पळाले दरोडेखोर

दरोड्याची तयारी; पोलिसांची चाहूल लागताच कार, पिस्तूल, साहित्य टाकून पळाले दरोडेखोर

Subscribe

आडगाव पोलिसांच्या गस्ती पथकामुळे दरोड्याचा अनर्थ टळल्याचे समोर आले आहे. आडगाव शिवारातील कोनार्क नगर भागात चोरट्यांचा दरोड्याचा प्रयत्न पोलिसांनी उधळून लावला. पोलिसांची चाहूल लागताच चोरटे वाहनासह पिस्तूल आणि दरोड्याचे साहित्य सोडून पळून गेले. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अनोळखी दरोडेखोरांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, सोमवारी (दि.२७) मध्यरात्री गस्तीवरील पोलीस गस्त घालत होते. त्यावेळी महामार्गाने कोनार्क नगर भागात भरधाव शिरलेल्या कारचा (डीएल ३ सीबीझेड ६३०७) पोलिसांना संशय आला. कारच्या नंबर प्लेटवरील नंबरवरून पोलिसांनी पाठलाग सुरु केला. पोलिसांची चाहूल लागताच दरोडेखोरांनी कार गार्गी मेडिकलसमोर पार्क पळ काढला. पोलिसांनी कारची तपासणी केली असता कारमध्ये गावठी कट्टा, मोबाईल, दरोड्याचे साहित्य तसेच पाकिट मिळून आले. पाकिटातील कागदपत्राच्या आधारे कार रफत अली यांच्या नावे असून त्याच नावाचे आधार कार्ड आणि महत्वाचे कागदपत्र मिळून आले आहेत. कारला उत्तर प्रदेश येथील आयसीआयसीआय बँकेचे फास्ट टॅग चिटकविलेले आहे.

- Advertisement -

पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हीच्या शोध घेतला असता कारमधून पाच संशयितांनी पळ काढल्याचे दिसून आले. या कागदपत्राच्या आधारे परप्रांतीय दरोडेखोर असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. तसेच राजाराम भूमीराज निवासी यांच्या नावाचा नोटरी बॉण्ड आणि कार रिपेअरींगची पावती मिळून आली आहे. कार, रिव्हाल्वर व दरोड्याचे साहित्य असा सुमारे पाच लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचारी अमोल देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस दप्तरी दरोड्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक तोडकर करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -