Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश 'त्या' फोटोची तयारी सुरू, लोकसभा होणार विसर्जित? अमोल कोल्हेंचा दावा, म्हणाले...

‘त्या’ फोटोची तयारी सुरू, लोकसभा होणार विसर्जित? अमोल कोल्हेंचा दावा, म्हणाले…

Subscribe

लोकसभा विसर्जित केली जाते, तेव्हा सर्व सदस्यांचा ग्रूप फोटो काढला जातो. मिळालेल्या माहितीनुसार, हा ग्रूप फोटो काढण्याची पूर्वतयारी करण्यात आली आहे. याचाच अर्थ, हे विशेष अधिवेशन 17 व्या लोकसभेचं कदाचित शेवटचं अधिवेशन असू शकतं.

केंद्र सरकारनं संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान संसदेचं विशेष अधिवेशन बोलाण्यात आलं आहे. या अधिवेशनात मोदी सरकार मोठे निर्णय घेणार असल्याचं बोललं जात आहे. 10 हून अधिक महत्त्वाची विधेयकं माडंली जातील अशीही माहिती समोर आली होती. खरं तर जेव्हापासून संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे, तेव्हापासूनच अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. एक देश एक निवडणूक हे विधेयक मंजूर केलं जाईल, असंदेखील म्हटलं गेलं. आता असाच एक दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी केला आहे. त्यांनी एक व्हिडीओ ट्वीटरवर शेअर केला आहे. यात त्यांनी हा दावा केला आहे. (Preparation of that photo Lok Sabha will be dissolved Amol Kolhe s claim know in details )

नेमकं काय म्हणाले अमोल कोल्हे?

अमोल कोल्हे यांनी त्यांच्या युट्यूब चॅनलवर एक देश, एक निवडणूक मुद्यावर सविस्तर माहिती देणारा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या संदर्भात त्यांनी ट्वीटरवरही माहिती दिली आहे. इव्हीएमविषयी संशय व्यक्त होत असताना एक देश, एक निवडणूक इव्हीएमवर होणार की बॅलेट पेपरवर? निवडणूक प्रक्रियेतली पारदर्शकता व विश्वासार्हता जपायची असेल, तर निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्याचं धाडस मोदी सरकार दाखवणार का? नसेल तर निवडणुकीची विश्वासार्हता राखली जाणार का? असे प्र्श्न त्यांनी यावेळी उपस्थित केले.

- Advertisement -

इतकचं नाही तर यावेळी त्यांनी एक मोठा दावा केला आहे. अमोल कोल्हे म्हणाले आहेत की, लोकसभा विसर्जित केली जाते, तेव्हा सर्व सदस्यांचा ग्रूप फोटो काढला जातो. मिळालेल्या माहितीनुसार, हा ग्रूप फोटो काढण्याची पूर्वतयारी करण्यात आली आहे. याचाच अर्थ, हे विशेष अधिवेशन 17 व्या लोकसभेचं कदाचित शेवटचं अधिवेशन असू शकतं. लोकसभा विसर्जित करून मोदी सरकार मूदतपूर्वी निवडणुकांना सामोरं जाऊ शकतं. याला पुष्टी देणारी दुसरी बाब म्हणजे अधीर रंजन चौधरींनी या समितीच्या सदस्यत्वाला दिलेला नकार, त्यांनी कारण दिलं आहे की ही समिती व्यवहार्य तपासण्यासाठी स्थापन झाली असली, तरी तिच्या अटींवर उद्देश साध्या व्हावा, हा हेतून या समितीचा दिसतो. अर्थात एक देश एक निवडणूक राबवण्याचा मोदी सरकारचा निर्णय झाला आहे, असं अमोल कोल्हे व्हिडीओमध्ये म्हणाले आहेत.

(हेही वाचा: मुख्यमंत्र्यांना हेलिकॉप्टरने शेतात आराम करायला जायला वेळ, पण…; दुष्काळी परिस्थितीवर ठाकरेंचा टोला )

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -