घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रशिर्डीत साईबाबांच्या पुण्यतिथी उत्सवाची तयारी पूर्ण

शिर्डीत साईबाबांच्या पुण्यतिथी उत्सवाची तयारी पूर्ण

Subscribe

पुण्यतिथीनिमित्त चार दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

शिर्डी : श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था (शिर्डी) च्या वतीने आयोजित केलेल्या १०४ वा श्री पुण्यतिथी उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. मुंबई येथील व्दारकामाई मंडळाच्या वतीने आकर्षक विद्युत रोषणाई व सर्वधर्म समभाव आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव यावर आधारित श्री साई दरबार हा भव्य देखावा प्रवेशव्दारावर उभारण्यात आला आहे. तसेच उत्सवकाळात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली.

बानायत म्हणाल्या, जगभरात श्री साईबाबांचे लाखो साईभक्त आहेत. हे साईभक्त श्री पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त आपल्या सदगुरुंचा आशिर्वाद ग्रहण करण्याकरीता शिर्डीला येतात. त्यामुळे श्रींच्या समाधीच्या दर्शनाकरीता साईभक्तांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेवून मंदिर परिसरासह चावडी समोर, मारुती मंदिर ते शामसुंदर हॉल, समाधी मंदिराच्या दक्षिण बाजुकडील पालखी मार्ग, साई उद्यान परिसर, जुना पिंपळवाडी रोड दर्शनरांग व नविन श्री साईप्रसादालय परिसर आदि ठिकाणी ५२ हजार चौरस फुटाचे मंडप उभारण्यात आलेले आहे. तसेच अतिरिक्त निवासव्यवस्थेसाठी भक्तनिवासस्थान (५००रुम) येथे चार हजार ५०० चौरस फुटाचा मंडप उभारण्यात आला आहे. तसेच साईभक्तांकरीता सुमारे १५० क्विंटल साखरेचे मोतीचूर लाडू प्रसाद पाकीटे तयार करण्यात आले असून, उत्सव कालावधीत भक्तांना प्रसाद लाडू पॅकेट सहजतेने उपलब्ध व्हावे यासाठी श्री साईनाथ मंगल कार्यालय, व्दारकामाई समोरील खुले नाट्यगृह, मारुती मंदिराशेजारी साईकॉम्प्लेक्स, श्री साईप्रसादालय, सेवाधाम इमारत व सर्व निवासस्थाने आदी ठिकाणी लाडू विक्री केंद्र उभारण्यात आले आहेत. तसेच आवश्यकता भासल्यास अतिरिक्त लाडू विक्री केंद्र उभारण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.

- Advertisement -

श्री पुण्यतिथी उत्सवानिमित्त समाधी मंदिर व मंदिर परिसरात, व्दारकामाई, चावडी व गुरुस्थान या ठिकाणी हैद्राबाद येथील दानशुर साईभक्त ए.महेश रेड्डी यांच्या देणगीतून आकर्षक फुलांची सजावट करण्यात येणार आहे. हा उत्सव यशस्वरित्या पार पाडण्यासाठी संस्थानचे तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधिश सुधाकर यार्लगड्डा, सदस्य तथा जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले व मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थानचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल जाधव, सर्व प्रशासकीय अधिकारी, संरक्षण अधिकारी, कर्मचारी प्रयत्नशील आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -