घर महाराष्ट्र बीडमधील अजित पवारांच्या उत्तरदायित्व सभेची तयारी जोरात; धनंजय मुंडेंनी टीझर केला शेअर

बीडमधील अजित पवारांच्या उत्तरदायित्व सभेची तयारी जोरात; धनंजय मुंडेंनी टीझर केला शेअर

Subscribe

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज बीडमध्ये सभा आहे. नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बीडमध्ये सभा पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर शरद पवार यांचा राज्यभर दौर सुरू केले असून सभा घेत आहे. शरद पवारांच्या सभेनंतर आता अजित पवार काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे. त्यापूर्वीच अजित पवारांच्या बीडच्या सभेचा टीझर लँच राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर शेअर केला आहे.

अजित पवारांच्या सभेच्या टीझरमध्ये शरद पवार यांच्या फोटो वापरलेला नाही. कारण काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी अजित पवार गटाला त्यांचा फोटोचा वापरण्यास मनाई केली आहे. यामुळे टीझरमध्ये शरद पवारांचा फोटो दिसत नाही. या टीझरमध्ये राष्ट्रवादी पुन्हा हे गाण्यावर राज्याचे शरद पवार आणि यांच्या भाषणातील काही विधान आहेत. ‘बीड जिल्ह्याचा मागासलेपणाचा विषय कधीच सुटणार, धनंजय मुंडेच्या वाक्याने टीझरला सुरुवात झाली आहे. तर टीझरमध्ये ‘उत्तर देण्यासाठी नाही. तर उत्तर शोधण्यासाठी येत आहोत…बळीराजाच्या संघर्षाची कारणे शोधण्यासाठी येत आहोत…बीड जिल्ह्यातील लाखो ऊसतोड कामगाराच्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी येत आहोत…गोदावरी आणि सिंदफण नदीकाठच्या बळीराजाच्या पाण्याचा प्रश्न सोडण्यासाठी येत आहोत…मराठवाड्यातल्या जनतेला हक्काचे पाणी मिळवून देण्यासाठी येत आहोत…बहाद्दर बळीराजाला पीक विम्याचे संरक्षण देण्यासाठी येत आहोत…तमाम बीड जिल्ह्यावासियांच्या आशीर्वादासाठी येत आहोत…विकसनशील राज्यांच रणशिंग फुंकण्यासाठी येत आहोत…’ “मला राज्याचा विकास करायचा आहे. जातीपातीचे आणि नातीगोत्याचे राजकारण करायचे नाही”, अजित पवारांच्या या वाक्याने या टीझरचा शेवट होत आहे.

- Advertisement -

पवारांच्या सभेसाठी बीडमध्ये मोठे बॅनर

बीडमध्ये अजित पवारांच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू आहे. यासभेसाठी वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आला आहे. अजित पवारांचा ताफा हा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, अण्णा भाऊ साठे पुतळा, जालना रोड आणि बार्शी रोड येथे मोठे बॅनर आणि भव्य कटआउट्स लावण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – “शक्तीपीठ महामार्गाने मराठवाड्याचे भाग्य बदलणार”, फडणवीसांचा दावा

अजित पवारांची उत्तरदायित्व सभा

अजित पवार बीडमध्ये आल्यानंतर प्रथम प्रभू वैजनाथाच्या चरणी नतमस्तक होणार आहेत. यानंतर सभे स्थळी जाणार आहे. अजित पवारांची बीडमधील सभा ही उत्तरदायित्वाची सभा आहे. राज्यात अजित पवार गटाचे पुढील काळात सभा होणार असल्याची माहिती अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे.

- Advertisment -