शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यावरून शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यात घमासान होणार आहे. दोन्ही गटाच्या दसऱ्या मेळाव्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. दोन्ही गटाकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. परंतु या मेळाव्यासाठी मुंबई पोलिसांकडून कडक बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी वर्षभरात निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांची आणि अंमलदारांची नियुक्ती मेळाव्यात करण्यात आलेली आहे.
वर्षभरात निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांची आणि अंमलदार यांची दसऱ्या मेळाव्यात विशेष पोलीस अधिकारी म्हणून नियुक्त करावी, असे आदेश पोलीस उपायुक्त परिमंडळ यांनी जारी केले आहेत. दसरा मेळाव्यामध्ये कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी तयारी सुरु केली आहे. बीकेसी मैदानात मुंबई पोलिसांसाठी एक मॉनिटर रुम तयार करण्यात आले आहे.
मुंबई पोलिसच नाही तर स्पेशल युनिट, एसआरपीएफच्या टीम्स, रॅपीड अॅक्शन फोर्स, एटीएस या टीम दसरा मेळाव्यासाठी तैनात करण्यात येणार आहेत.
दसरा मेळाव्याकरीता गर्दी जमवण्यासाठी ठाकरे व शिंदे गटाकडून सध्या जोरदार तयारी सुरू असून, वाहनांमधून अधिकाधिक कार्यकर्त्यांना मुंबईत घेऊन येण्याची स्पर्धा रंगल्याचे पाहायला मिळत आहे. लहान-मोठ्या अशा एकूण 10 हजार वाहनांमधून कार्यकर्ते मुंबईत दाखल होणार आहेत. यामध्ये 6 हजार एसटी तसेच खासगी बसगाड्यांचा समावेश आहे.